शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने दिला गुपचूप शॉक, बिलामागे दहा रुपये दरवाढ, मनपा क्षेत्रात स्थिर आकार वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 07:37 IST

महावितरणने गुपचूप सर्व महानगर पालिका क्षेत्रात वीज महाग केली आहे. घरगुती ग्राहकांना आता जे बिल येत आहे, त्यात १० रुपयांचा स्थिर आकार (फिक्स्ड चार्ज) अतिरिक्त वसुली सुरू झाली आहे.

- कमल शर्मानागपूर : महावितरणने गुपचूप सर्व महानगर पालिका क्षेत्रात वीज महाग केली आहे. घरगुती ग्राहकांना आता जे बिल येत आहे, त्यात १० रुपयांचा स्थिर आकार (फिक्स्ड चार्ज) अतिरिक्त वसुली सुरू झाली आहे. ही वसुली केव्हापर्यंत चालेल, हेही कंपनीने सांगितलेले नाही. मात्र, एप्रिल २०२२ पासून यात पुन्हा वाढ केली जाईल, हे स्पष्ट केले आहे. 

महावितरणने विजेच्या दरात थेट वाढ न करता अन्य स्रोतांद्वारे ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याची रणनीती आखली आहे. कंपनीला प्रदेश नियामक आयोगाकडूनही हिरवा कंदील मिळत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये घरगुती ग्राहकांच्या सिंगल फेज कनेक्शनमध्ये दोन रुपये, थ्री फेज कनेक्शनवर प्रति किलोवॅट ५ रुपये वाढविण्यात आले होते. एप्रिल २०२२ मध्ये या दरांमध्ये पुन्हा वाढ प्रस्तावित आहे. दरम्यान, महावितरणने नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, चंद्रपूरसह राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांत प्रति कनेक्शन १० रुपये अतिरिक्त शुल्क वसूल करणे सुरू केले आहे. एप्रिल २०२१ मध्येच मंजुरीमहावितरणने स्पष्ट केले आहे की, नियामक आयोगाने एप्रिल २०२१ मध्येच या दरवाढीला मंजुरी दिली होती. परंतु, नागरी क्षेत्र निश्चित करण्यास विलंब झाला. बऱ्याच चर्चेनंतर आता नोव्हेंबरपासून मनपा क्षेत्रात ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र