शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मृगनयनी प्रदर्शन : पतौडीचे वंशज, पाकीजाची कलाकृती अन् होळकरांचे कारागीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:41 IST

भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅन्टिक वस्तूंसोबतच सुरेख कलाकृतींचे प्रदर्शन ठरतेय आकर्षक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.मृगनयनी म.प्र. हस्तशिल्प आणि हातमाग विकास निगम व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘मृगनयनी मध्यप्रदेश प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मध्यप्रदेशातील पारंपरिक कलाकृतींना आकार देणाऱ्या कलावंतांचे वंशज त्यांच्या कलाकृतींसह सहभागी झाले आहेत. त्यात नवाब पतौडी यांची नात, पाकीजा चित्रपटात मीनाकुमारीने धारण केलेली चंदेरी साडी बनविणारे कलावंत, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी प्रोत्साहन दिलेल्या माहेश्वरी कलाकृतीच्या कारागिरांचे वंशज आणि अन्य अनेक व्यक्तिगत तसेच घरादाराला सौंदर्याने नटविणाऱ्या वस्तू सादर झाल्या आहेत. त्यात हस्तकौशल्याने बनिवलेल्या बॅग, पर्स, साड्या, खेळण्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. यात ७७ कलावंत सहभागी असून, पाच-सात कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.खिरवडकर यांच्या हस्ते उद्घाटनदमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. यावेळी, मृगनयनीचे एम.एल. शर्मा उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी असणाऱ्या सर्व वस्तू या कोणत्याही मशिनरीशिवाय बनविण्यात आल्या असून, या कलाकृतींचे देश-विदेशात प्रचंड मागणी असल्याचे शर्मा यांनी सांगितले.अडीच लाखाची चंदेरी साडी 

या प्रदर्शनात दोन ते अडीच लाख रुपये किमतीच्या चंदेरी साड्या सादर करण्यात आल्या असून, यातील कलाकृती सोने आणि चांदीच्या तारांनी घडविण्यात आल्या आहेत. त्यात मुद्रा, महेश्वरी येथील मंदिरांच्या खिडक्यांमध्ये असलेल्या डिझाईन्स तंतोतंत साड्यांवर साकारण्यात आलेल्या आहेत.बुद्धाचा संपूर्ण इतिहास दर्शविणारी मूर्ती 
प्रदर्शनात बुद्ध, क्रिष्ण, महादेव शिवाच्या मूर्ती सादर करण्यात आल्या आहेत. बुद्धाच्या मूर्तीच्या पाठमोऱ्या भागात बुद्धाच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतचा चित्र इतिहास साकारण्यात आलेला आहे. यासोबतच, कृष्ण, महादेवाच्या मूर्तीच्या पाठमोऱ्या भागाला वेगवेगळ्या कलाकृतींचे दर्शन दिसून येते.भोपाळची ओळख ‘जरी जर्दोजी’खैनीच्या शौकिनांसाठी बनविण्यात आलेल्या ‘जरी जर्दोजी’ पिशव्या सादर आहेत. विशेष म्हणजे, या पिशव्या भोपाळची ओळख म्हणून प्रसिद्ध आहेत. नातू हमीद उल्ला खान नवाब पतौडी यांच्या नातीन फिरोजा-अफरोज या पिशव्या घेऊन आल्या आहेत. यासोबतदालिम्बी आणि अनारी गुलाबी या माहेश्वरी साड्यांचे कारागीर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अहमद हुसैन अंसारी व वसंत श्रवणेकर आले आहेत. ही या कारागिरीची सातवी पिढी आहे. यासोबतच, पाकीजा चित्रपटात मीनाकुमारी यांची साडी बनविणारे अब्दुल हकीम खलिफा आले आहेत.

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र