शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

आकर्षक बनणार अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:29 IST

रामझुला ते प्रजापतीनगर चौकाकडे जाणाºया मेट्रो रेल्वे मार्गावर सेंट्रल एव्हेन्यू येथील अग्रसेन चौकात मेट्रो स्टेशन आकर्षक बनविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांसाठी सुविधा : व्यावसायिक चहलपहल वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामझुला ते प्रजापतीनगर चौकाकडे जाणाºया मेट्रो रेल्वे मार्गावर सेंट्रल एव्हेन्यू येथील अग्रसेन चौकात मेट्रो स्टेशन आकर्षक बनविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले आहे. पश्चिमहून पूर्वला जोडणारी आणि या भागातील नागरिकांसाठी लाईफलाईन बनणाºया मेट्रो रेल्वेच्या दोन स्टेशनचे डिझाईन एकसारखे बनविण्यात आले आहे.यामध्ये एक अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन आणि दुसरे दोसर वैश्य चौक मेट्रो स्टेशन डिझाईनचा समावेश आहे. स्टेशनचे प्रारंभिक बांधकाम सुरू झाले आहे.मेट्रो रेल्वे प्रकल्पाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या पुढाकाराने नागपूरचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच कारणामुळे बहुतांश मेट्रो स्टेशनचे डिझाईन आगळेवेगळे आहे. अग्रसेन मेट्रो स्टेशन गांधीबाग आणि इतवारी या व्यावसायिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार अहे.अग्रसेन चौकाच्या चारही बाजूला जुन्या निवासी वस्त्या असल्यामुळे येथील रहिवासी मेट्रो रेल्वेचा वाहतुकीसाठी उपयोग करतील. गांधीबाग, जलालपुरा, हंसापुरी, खदान परिसर, भालदारपुरा आणि लगतच्य वस्त्यांसाठी अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन केंद्रबिंदू ठरणार आहे.सुलभ वाहतूक आणि वेळेनुसार मेट्रो रेल्वेचे संचालन होणार असल्यामुळे निश्चितच या भागात व्यावसायिक चहलपहल वाढणार आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी पार्किंग, आसपासच्या नागरिकांना ये-जाकरिता फिडर सेवा उपलब्ध राहतील. यासह दिव्यांग आणि वयस्कांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहेत. मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी अनुकूल बनविण्याच्या दिशेने मेट्रो व्यवस्थापन विशेष प्रयत्न करीत आहे.