शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरिक औषधांची चळवळ आता मनीषनगरातही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:24 IST

स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.

ठळक मुद्देजनमंचचा उपक्रम : शहरातील नववे औषधालय सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना महागडी औषधे पैशांअभावी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना कमीतकमी पैशात औषधे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने जनमंचने नागपुरात धरमपेठ आणि यादवनगर येथे जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले. साधारणत: डॉक्टरांचे तपासणी शुल्क १० ते २० टक्के एवढे असते तर ८० ते ९० टक्के औषधांवर खर्च होतो. जेनेरिक औषधे खरेदी करून हा खर्च कमी करता येतो. जनमंचने सन २०१२ मध्ये ही चळवळ सुरू केली. याअंतर्गत आतापर्यंत लक्ष्मीनगर, मेडिकल चौक, सदर, मानेवाडा, नंदनवन, उमरेड येथे दुकाने सुरू करण्यात आली आहेत. आता मनीषनगरातही ही चळवळ पोहोचली आहे.ज्येष्ठ नागरिक तसेच बेसा येथील स्वामीधामचे अध्यक्ष दिनकर कडू यांनी फित कापून औषधालयाचे उद्घाटन केले. यावेळी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, डॉ. पिनाक दंदे, अरविंद पाटील, प्रमोद पांडे, प्रकाश इटनकर, अ‍ॅड. मनोहर रडके प्रामुख्याने उपस्थित होते.जेनेरिक औषध म्हणजे कायजेनेरिक औषध म्हणजे औषधांचे केमिकल नाव नसून त्यात असलेल्या घटक पदार्थाचे नाव आहे. उदा. क्रोसिन, अ‍ॅस्प्रिन, डिस्प्रिन या औषधी ब्रॅण्डेड नावाने लिहिल्या जातात. यात मूळ घटक ‘पॅरासिटॉमॉल’ असतो. डॉक्टरांनी हीच औषधे जेनेरिक नावाने लिहून दिली तर त्याची किंमत ४० ते ७० टक्क्यांनी कमी होत असते. अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांत जवळपास सगळीच औषधे जेनेरिक नावानेच लिहितात व वापरतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने आपल्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहिण्याचा आग्रह करावा, असे आवाहन जनमंचने केले आहे. 

टॅग्स :generic Medicinesजेनरिक औषधंnagpurनागपूर