शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

नागपूर विभागासाठी ६ हजार कोटीचे सामंजस्य करार

By आनंद डेकाटे | Updated: March 20, 2025 19:03 IST

विभागीय गुंतवणूकदार परिषद : १५२ उद्योगांमध्ये ६ हजार ७५६ रोजगार निर्मिती होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे नागपूर विभागीय स्तरावर गुंतवणूक परिषद २०२५ गुरूवारी नियोजन भवनाच्या सभागृहात पार पडली. या परिषदेत १५२ उद्योजकांचे ६ हजार १०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विदर्भात विविध क्षेत्रात झालेल्या सांमजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये रुपांतर व्हावे यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व विभागीयस्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योजकांनी मोठया प्रमाणात विभागात गुंतवणूक करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी यावेळी केले.

यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष जुल्पेश शहा, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष पी.मोहन, बुटीबोरी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर मालविया, मैत्रीचे समन्वय अधिकारी भास्कर मोराडे, सिडबीचे सहायक महाव्यवस्थापक संतोषराव मोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार, लोपॅक इंडिया लिमिटेडचे शशांक मिश्रा व इंनव्हेन्ट्री रिसर्च कंपनीचे डॉ. दीपक बिरेवार यांच्यासह उद्योजक, गुंतवणुकदार मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतातील पहिला अत्याधुनिक कागद उद्योग सुरु करणारे झेलोपॅक इंडिया लिमिटेडचे शशांक मिश्रा व इंनव्हेन्ट्री रिसर्च कंपनीचे डॉ. दीपक बिरेवार यांनी येथे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले. संचलन व आभार उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्देमवार यांनी मानले.

उद्योजकांसाठी रेड कारपेटसह आवश्यक सुविधा - विजयलक्ष्मी बिदरी

जिल्हास्तरावर गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना रेड कारपेटसह आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देत आहोत. गडचिरोली जिल्हा स्टिलहब म्हणून विकसित होत असून मोठया प्रमाणात येथे गुंतवणुक येत आहे. १०० दिवसाच्या विशेष कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उद्योजक व गुंतवणुकदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर तर विभागीय आयुक्त विभागीयस्तरावर आढावा घेऊन उद्योजकांच्या अडचणी सोडवतील, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

दावोसमध्ये विदर्भासाठी ७ लक्ष कोटीचे करारउद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी प्रास्ताविकात दावोस येथील परिषदेमध्ये विदर्भासाठी ७ लक्ष कोटीचे करार झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी १ लक्ष ६ हजार कोटीचे सामंजस्य करार झाले आहे.

असे झाले करार

  • गोदिंया येथे एक्सलोपॅक इंडिया लिमिटेड या हायटेक पेपर इंडस्ट्रिज व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनीतर्फे ९५० कोटी, तसेच पेपर उद्योगात २२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकी संदर्भात शशांक मिश्रा यांनी करार केला.
  • बुटीबोरी येथे इंनव्हेन्टीस रिसर्च कंपनीतर्फे औषध व रासायनिक निर्मिती क्षेत्रात ७०० कोटी रुपयाची गुंतवणूक
  • हॉटेल ताज गेटवे (पीडी प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात ४०० कोटी
  • हयात हॉटेल (रचना प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात ३०० कोटी रुपये
  • फेयर व्हॅल्यु हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात १३१ कोटी ३० लक्ष रुपये
  • हॉटेल हिलटॉनतर्फे पर्यटन क्षेत्रात १७५ कोटी रुपये
  • विठोबातर्फे १०० कोटी रुपये
टॅग्स :nagpurनागपूर