शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

मातृदिनी ‘ती’ परतली मायेच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 09:55 IST

दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे घडतात, की जे अनुभवताना डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतात. असाच काहीसा प्रसंग मातृदिनी नागपुरातील दिघोरी परिसरात अनुभवायला आला.

ठळक मुद्देपळवून नेलेल्या चिमुकलीला मिळाले मातृछत्र अनेकांच्या कडा पाणावल्या

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे घडतात, की जे अनुभवताना डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतात. असाच काहीसा प्रसंग मातृदिनी नागपुरातील दिघोरी परिसरात अनुभवायला आला. आठ दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मातृछत्र मिळाले. आठ दिवसांपासून दूर असलेली आई अचानक भेटल्यानंतरचा तो प्रसंग बघून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.लक्ष्मी ठाकूर असे या चिमुकलीचे नाव आहे. दिघोरी परिसरात आजारी आईसोबत ती उघड्यावर राहत होती. याचा फायदा घेत एका महिलेने त्या चिमुकलीला आठ दिवसांपूर्वी पळवून नेले. या चिमुकलीला बैतुल पोलिसाच्या रेस्क्यु टीमने ताब्यात घेतले. ती नागपूरला राहत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे बैतुल पोलिसांनी नागपूर जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. शनिवारी बैतुल पोलीस तिला नागपुरात घेऊन आले. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिला श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. ती मोठा ताजबाग परिसरात राहत असल्याचे सांगत होती. आज मातृदिनाला तिच्या आईची भेट घडवून देण्याचे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात व जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी ठरविले. ते दोघे सकाळीच श्रद्धानंद अनाथालयात पोहचले. अनाथालयाचे काळजीवाहक सुभाष वाघमारे व रेखा वाघमारे यांना सोबत घेऊन मुलीसह ते मोठा ताजबाग परिसरात पोहचले.ती ताजबाग परिसरात पोहचल्यानंतर तिने आईच्या ठिकाणाचा पत्ता लावला. तिची आई दिघोरी परिसरातील प्रगती सांस्कृतिक भवनाच्या मागील उद्यानातील झाडाच्या सावलीत बसली होती. त्या चिमुकलीला आई दिसताच तिने घट्ट मिठी मारत, तिच्या कुशीत जाऊन रडत सुटली. लक्ष्मीची आई सापडल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना दिली. परदेसी यांनी त्या दोघींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर, हुडकेश्वर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिसांच्या मदतीने या दोघींना प्रियदर्शिनी वसतिगृहात दाखल करण्यात आले.मन बेचैन होतंजिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी शनिवारी मुलीला बैतुल पोलिसांच्या ताब्यातून श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. आज मातृदिन असल्याने तिला आई मिळावी, असे मनातून वाटत होते. त्यांनी समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांना संपर्क केला. त्यांनीही होकार दिल्याने, दोघांनीही आईचा शोध घेऊन, चिमुकलीला आई मिळवून दिली.आई आहे दुर्धर आजाराने ग्रस्तझाशीमध्ये राहणारी लक्ष्मीची आई अनिता ठाकूर ही दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. नवऱ्याने सोडल्यामुळे ती चिमुकलीसोबत नागपुरात भटकंती करीत आहे. दिघोरी परिसरातील एका उद्यानाच्या झाडाखाली तिचा निवारा आहे. महिला व बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी तिच्या आईची अवस्था बघितली. चिमुकल्या लक्ष्मीसोबत आईचेही पुनर्वसन करण्यासाठी त्यांना प्रियदर्शिनी वसतिगृहात पाठविण्यात आले.

टॅग्स :Mothers Dayमदर्स डे