शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मम्मीने बुलाया है...

By admin | Updated: September 4, 2014 00:58 IST

मम्मीने क्लिनिकमध्ये बोलवल्याचे कळल्यामुळे युगने दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डला कुणासोबत चाललो, ते सांगण्याचीही तसदी घेतली नाही. कारण आता आपल्याला

आईस्क्रीम, चॉकलेट खिलाता हूं : क्रूरकर्म्याने आमिष दाखवून युगला संपवलेनागपूर : मम्मीने क्लिनिकमध्ये बोलवल्याचे कळल्यामुळे युगने दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डला कुणासोबत चाललो, ते सांगण्याचीही तसदी घेतली नाही. कारण आता आपल्याला मम्मीसोबत गप्पा करायला मिळणार, छानपैकी काही तरी खायला मिळणार, या कल्पनेनेच तो हुरळला होता. ज्याच्यासोबत चाललो तो क्रूरकर्मा मम्मीच्या क्लिनिकमध्ये नव्हे तर थेट काळाच्याच जबड्यात नेणार त्याला ही कल्पनाच नव्हती. अन् एवढी भयावह कल्पना करण्याचे त्याचे वयही नव्हते. त्याचमुळे त्याचा घात झाला. मम्मीने बोलवल्याची थाप मारून राजेशने चिमुकल्या युगला त्याच्या आईपासून कायमचे हिरावून नेले. पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (रा. वांझरी, कळमना) आणि अरविंद अभिलाष सिंग (रा. नारा रोड, जरीपटका) हे दोघेही थंड डोक्याचे गुन्हेगार आहेत. अपहरण आणि खून केल्यानंतर तब्बल २४ तास उजळ माथ्याने फिरणाऱ्या या क्रूरकर्म्यांनी आता कुठे पोलिसांपुढे नांगी टाकली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांसमोर एक एक धक्कादायक पैलू उघड करीत आहेत. एक आठवड्यापूर्वी कट रचलाआरोपी राजेशला १२ आॅगस्टला कामावरून काढण्यात आले. त्यामुळे डॉक्टरला धडा शिकवायचा आणि त्यांच्याकडून रोकडही वसूल करायची, असा कट आरोपीने रचला. एक आठवड्यापूर्वी क्रूरकर्मा राजेशने युगच्या अपहरणाच्या कटाचा विचार अरविंदला सांगितला. पाच ते दहा कोटी रुपये मिळतील. जीवनभर ऐश करू, असेही सांगितले. अरविंदने कशाचाही विचार न करता या कटात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर एखाद्या सिनेमाच्या स्क्रीप्टप्रमाणेच या दोघांनी आपले कटकारस्थान पूर्ण केले. आपल्याला सर्व जण ओळखतात त्यामुळे राजेशने स्वत: युगला सोबत घेण्याऐवजी अरविंदला लाल रंगाचा टी शर्ट (क्लिनिकमध्ये असताना राजेश वापरायचा) घालायला सांगून दुपारी ३.३० वाजता स्कूटी घेऊन युगच्या घरासमोर उभे केले. (युग कोणता आहे, हे राजेशने अरविंदला आधीच दाखवले होते) युग स्कूलबसमधून उतरताच अरविंदने त्याला हात पकडून जवळ ओढले. ‘मम्मीने क्लिनिक मे बुलाया है... चल जल्दी. रास्ते मे चॉकलेट और आईस्क्रीमभी खायेंगे’ असे म्हणत त्याने युगला सोबत घेतले. मम्मीसोबत राहायला मिळणार, त्यात चॉकलेट, आईस्क्रीमही मिळणार, हे ऐकून युग हुरळलाच. आपल्या क्लिनिकचा टी शर्ट घालून असल्यामुळे तो (अरविंद) कर्मचारीच असावा, असे मानत युग त्याच्यासोबत चलण्यास तयार झाला. दप्तर ठेवून येण्यापूर्वी ‘गार्ड को कुछ बताना नही’, ही सूचना केली. निरागस युगने मम्मीच्या नावाखाली ती सूचनाही तंतोतंत पाळली.(प्रतिनिधी) युगच्या लक्षात आले होते, पण...आईस्क्रीम, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अरविंदने दुचाकी लकडगंज बगिचा चौकाकडे नेली. तेथे राजेश दिसला. त्यानेही चॉकलेटचे आमिष दाखवले. मात्र, हे दोघे विनाकारण इकडे तिकडे फिरवत आहेत, आपल्या क्लिनिकच्या रस्त्याने न नेता भलतीकडेच घेऊन चालले आहे, ते दगाफटका करू शकतात, हे चिमुकल्या युगच्या लक्षात आले. त्यामुळे तो ‘जल्दी मम्मी की तरफ चलो’ म्हणून प्रतिकाराच्या पवित्र्यात आला. त्याने आरडाओरड केली तर, आपले कटकारस्थान उधळू शकतो, याची जाणीव राजेश आणि अरविंदला झाली. त्यामुळेच त्यांनी क्लोरोफॉर्मचा रुमाल युगच्या नाकातोंडावर घट्ट केला अन् बेशुद्धावस्थेतच त्याचा गळाही दाबला. आईकडे नेतो असे सांगून या क्रूरकर्म्यांनी एका निरागस जीवाला काळाच्या जबड्यात ढकलले.