शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याला शेजारच्या घरी ठेवून आईने केली आत्महत्या; मोठी मुलगी अंगणात होती खेळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 20:48 IST

Nagpur News पती कामावर तर माेठी मुलगी खेळायला गेल्याचे पाहून महिलेने तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला शेजारी नेवून ठेवले व घरी आल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पती कामावर तर माेठी मुलगी खेळायला गेल्याचे पाहून महिलेने तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला शेजारी नेवून ठेवले व घरी आल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना बुटीबाेरी शहरात रविवारी (दि. २१) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

प्रिया प्रमोद बारसागडे (२७, रा. भंडारा) असे मृत महिलेचे नाव असून, पती बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथे खासगी कंपनीत नाेकरी करीत असल्याने ती पती व मुलांसाेबत बुटीबाेरी शहरातील जुन्या वसाहतीत किरायाने राहायची. तिला आठ वषाची मुलगी आणि १४ महिन्याचा मुलगा आहे. प्रिया व प्रमाेद यांचा विवाह २०१३ मध्ये झाला हाेता. तिने रविवारी सकाळी पतीला जेवणाचा डबा तयार करून दिला व ताे कामावर निघून गेला. दुपारच्या सुमारास मुलगी घराबाहेर खेळायला गेली हाेती.

दरम्यान, तिने चिमुकल्याला शेजारी नेऊन ठेवले व घरातील कामे आटाेपल्यावर त्याला घ्यायला येते, अशी सूचनाही तिने शेजाऱ्यांना केली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मुलगी घरी गेली, तेव्हा तिला तिची आई छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ती रडत बाहेर येताच हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी प्रमाेदसह पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. घरी सर्व सुरळीत सुरू हाेते, अशी माहिती पती प्रमाेदने दिली असून, त्याला शेजाऱ्यांनी दुजाेरा दिला. असे असताना प्रियाने आत्महत्या का करावी, हे सध्यातरी अनाकलनीय आहे. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू