शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मुलीची शुश्रूषा करता करता आई झाली कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:41 IST

घरातून केवळ अकरा वर्षीय मुलीचा नमुना पॉझिटिव्ह येताच तिच्यापेक्षा तिची आईच घाबरली. मुलीला रुग्णालयात कसे एकटे ठेवणार म्हणून तीही तिच्यासोबत रुग्णालयात राहू लागली. १४ दिवसानंतर मुलीचा नमुना तपासण्यात आला. ती निगेटिव्ह आली. परंतु तिच्या आईचा नमुना पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देरुग्णालयातून मुलीला सुटी तर आई कोरोना वॉर्डात भरती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरातून केवळ अकरा वर्षीय मुलीचा नमुना पॉझिटिव्ह येताच तिच्यापेक्षा तिची आईच घाबरली. मुलीला रुग्णालयात कसे एकटे ठेवणार म्हणून तीही तिच्यासोबत रुग्णालयात राहू लागली. १४ दिवसानंतर मुलीचा नमुना तपासण्यात आला. ती निगेटिव्ह आली. परंतु तिच्या आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. सोमवारी सायंकाळी मुलगी रुग्णालयातून घरी जात असताना तिच्या आईची कोविड वॉर्डात भरतीची प्रक्रिया सुरू होती. मेयोमध्ये हे पहिल्यांदाच घडले.सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधित मृताकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून कोरोनाचा संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संशयित म्हणून पंधराशेवर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात सतरंजीपुऱ्यातील हेसुद्धा कुटुंब होते. संशयित म्हणून या कुटुंबाला रविभवन येथे क्वारंटाईन करण्यात आले. त्याच दिवशी ११ वर्षीय मुलीसह तिची आई व वडिलांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. २० एप्रिल रोजी याचा अहवाल प्राप्त झाला. घरातून केवळ मुलीचेच नमुने पॉझिटिव्ह तर आईसह तिच्या वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले. मुलीला मेयोमध्ये घेऊन जाण्यासाठी मनपा आरोग्य विभागाचे पथक धडकले. मुलीसोबत तिची आई घाबरली. ती रुग्णालयात एकटी कशी राहणार म्हणून मुलीसोबत मलाही ठेवा म्हणून तिच्या आईने डॉक्टरांकडे गळ घातली. डॉक्टरांनी स्थिती लक्षात घेऊन मुलीसोबत आईलाही रुग्णवाहिकेत बसविले. मेयोच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले. तिची आई तिची दिवस-रात्र काळजी घेत होती. सातव्या दिवशीचा मुलीचा नमुना निगेटिव्ह येताच सर्वाधिक आनंद तिच्या आईला झाला. आता लक्ष पुढील सात दिवसानंतर तपासल्या जाणाºया नमुन्यांवर होते. २४ तासांच्या अंतराने दोन नमुने तपासले जाणार होते. दोन मे रोजी मुलीचा पहिला नमुना घेण्यात आला. तो निगेटिव्ह आला. तीन मे रोजी तिचा दुसरा नमुना घेण्यात आला. आई तिच्यासोबत राहत असल्याने तिचाही नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. याचा अहवाल सोमवारी सायंकाळी आला. यात त्या मुलीचा नमुना निगेटिव्ह तर आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. त्या कुटुंबाला पुन्हा धक्काच बसला. त्याच दिवशी सायंकाळी मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर आईची कोविड वॉर्डात उपचारासाठी रवानगी करण्यात आली. पुढील १४ दिवस तिला आता रुग्णालयात काढावे लागणार आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस