शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांना ठार मारणाऱ्या  क्रूरकर्मा मुलाच्या धास्तीने आईचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:49 IST

नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव येथे घडला.

ठळक मुद्देनागपूर नजीक नवरगाव येथील  विहिरीत घेतली उडी : ग्रामस्थांनी वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव येथे घडला.संध्या गुलाब पालटकर (६०, रा. नवरगाव, ता. मौदा) असे नैराश्य आलेल्या क्रूरकर्मा विवेक पालटकरच्या आईचे नाव आहे. १० जूनच्या रात्री क्रूरकर्मा विवेक पालटकर हा नंदनवन येथे राहात असलेल्या जावई कमलाकर पवनकरच्या घरात शिरला. तेथे त्याने बहीण अर्चना, जावई कमलाकर, मीराबाई तसेच वेदांती आणि कृष्णाचा निर्घृण खून केला. ११ जून रोजी सकाळच्या सुमारास हा थरारक प्रकार लक्षात येताच सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपी विवेक हा पंजाबमध्ये पळाला होता. घटनेनंतर तब्बल १० दिवसांनी २१ जून रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियाना शहरातून त्याला अटक करीत नागपुरात आणले. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली.यापूर्वी आरोपीने त्याच्या पत्नीचाही खून केला. क्रूरकर्मा विवेक हा आपल्यालाही संपवू शकतो, असा विचार त्याची आई संध्या यांच्या मनात घोळत होता. त्यांचे पती गुलाबराव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून दोन्ही मुली या विवाहित असून बाहेरगावी असतात. त्यामुळे घरात एकट्याच राहत असल्याने घरी येऊन मुलगा आपला जीव घेणार तर नाही ना, असे सतत विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू होते. याबाबत त्यांनी ग्रामस्थांनाही सांगितले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांनी गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेत त्यांना विहिरीतून बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर