शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गॅंगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक; ४० हून अधिक प्रकरणांत गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 10:38 IST

मार्च महिन्यात या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. पोलिसांनी त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र, तो फरारच होता.

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून होता फरार

नागपूर : कुख्यात गॅंगस्टर आबू खानला अटक करण्यात अखेर नागपूर पोलिसांना यश आले आहे आहे. झोन चारचे उपायुक्त नुरूल हसन यांच्या नेतृत्वातील चमूने आबूला ताब्यात घेतले. आबूविरोधात ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते व अनेक दिवसांपासून तो फरार होता.

आबू खान हा कुख्यात गुंड असून, अनेक वर्षांपासून तो विविध गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिवे मारण्याची धमकी देणे, मालमत्ता हस्तगत करणे आदींमुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. ताजबागजवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर सहा दुकानांवर त्याने बळजबरीने ताबा मिळविला होता. हुसेन यांच्या तक्रारीनंतर आबू व त्याचे भाऊ अमजद व शहदाजा खान यांच्याविरोधात मकोका लावण्यात आला होता. तेव्हापासून आबू फरारच होता. मार्च महिन्यात या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. पोलिसांनी त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र, तो फरारच होता. खबऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. तो भंडारा येथे असल्याची टीप पोलिसांना मिळाली. तातडीने नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चमू भंडाऱ्याकडे रवाना झाला. तेथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

अमरावती, अहमदाबादमध्ये लपला होता आबू 

फरार झाल्यानंतर आबू सातत्याने त्याचे ‘लोकेशन’ बदलत होता. अमरावती, अहमदाबाद, गडचिरोली इत्यादी ठिकाणीदेखील तो लपला होता. अखेर त्याला भंडारा येथून अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरArrestअटक