शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वर्षभरात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:16 IST

नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातील आकडेवारी : नागपुरात ३६ तर चंद्रपूरमध्ये ५६ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली.सर्वाधिक ९३ आत्महत्या वर्धा जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या. यापैकी ५७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली, तर २३ प्रकरणे अपात्र ठरली. वर्ध्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात ५६ तर नागपूर जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूरमध्ये ३४ तर नागपुरात केवळ ८ शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी १३ आत्महत्या झाल्या. मात्र तेथील ११ प्रकरणे अपात्र ठरली व दोन कुटुंबीयांनाच मदत मिळाली.२००१ पासून वर्ध्यात १६०० हून अधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४००७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात एकट्या वर्धा जिल्ह्यात १६४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याखालोखाल चंद्रपूर (७५८), नागपूर (७३७), भंडारा (५३९), गोंदिया (२५०) व गडचिरोली (७७) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता