शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तीन कंपन्यांमध्ये होणार ८ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 31, 2024 00:04 IST

- ३१ हजार कोटींची गुंतवणूक : एक नागपूर भागात तर अतिरिक्त एमआयडीसी बुटीबोरीमध्ये दोन प्रकल्प

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : सरकारसोबत आधीच सामंजस्य करार झालेल्या तीन मोठ्या कंपन्यांना राज्य सरकारच्या उद्योग मंत्रालयाने मंगळवारी नागपुरात उद्योग स्थापनेला मंजूरी दिली. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. या कंपन्यांवर आधारित सूक्ष्म आणि लघु उद्योग नव्याने सुरू होतील. परंतु, याआधीच्या अनुभवानुसार एलजी आणि रिन्यूव्ह एनर्जी कंपन्यांप्रमाणे उद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग होऊ नये, असे उद्योजकांचे मत आहे.

दोन ते तीन वर्षांत होणार प्रत्यक्ष उत्पादनउद्योग मंत्रालयाच्या मंजूरीनंतर जवळपास ३१ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून उभ्या होणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती  होईल. लिथियम बॅटरी, सोलर पीव्ही मॉड्युल्स व इलेक्ट्रोलायझर आणि मद्यार्क निर्मिती होणार आहे. सरकारच्या मंजूरीनंतर या कंपन्यांना उद्योगाच्या उभारणीसाठी वर्षभरात विविध विभागाची मंजूरी घ्यावी लागेल आणि दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करावे लागेल. याकरिता उद्योग विभागालाही तत्पर राहून कंपन्यांना मंजूरी द्याव्या लागतील. सकारात्मक बाबी घडून आल्यास कंपन्या उभ्या होतील आणि वैदर्भीय युवकांना रोजगार मिळेल, असे उद्योजकांनी सांगितले.

जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लिमिटेड कंपनी लिथियम बॅटरी निर्मितीचा मोठा प्रकल्प नागपूर भागात सुरू करणार आहे. जागा अद्याप निश्चित झालेला नाही. पण हा प्रकल्पही नागपुरातील अतिरिक्त एमआयडीसी बुटीबोरीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. तर, आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प नागपुरातील अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरीमध्ये जवळपास ४ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून सुरू होणार आहे. हा प्रकल्प नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राहील. या प्रकल्पातून अडीच ते तीन हजार युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील. आवाडा इलेक्ट्रो कंपनी ही कंपनी जपानच्या हिताचीची उपकंपनी असल्याची माहिती आहे.

दोन वर्षात सुरू होणार परनॉर्ड रिकार्ड इंडिया कंपनीराज्य सरकारसोबत २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपुरात सामंजस्य करार झालेल्या परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लि.ला अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये प्रकल्प स्थापनेला मंजूरी मिळाली असून दोन वर्षांतच मद्यार्क निर्मितीला सुरुवात होईल. हा प्रकल्प १०० एकरात उभा राहील. कंपनी दहा वर्षांच्या कालावधीत १,७८५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवीन डिस्टिलरीमुळे उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल. दररोज ६० हजार लिटर क्षमतेचे हे युनिट भारतातील सर्वात मोठी माल्ट डिस्टिलरी म्हणून ओळखली जाईल.

टॅग्स :nagpurनागपूर