शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीपेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:42 IST

भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे ‘एचआयव्ही’पेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक असतो. परंतु आजही या रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे परिचारिकांपासून ते सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे१२ मधून १  बाधित : लसीकरणाकडे परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षजागतिक काविळ दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे ‘एचआयव्ही’पेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक असतो. परंतु आजही या रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे परिचारिकांपासून ते सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.‘हेपॅटायटीस’ म्हणजेच काविळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हेपॅटायटीस ए’, ‘बी’, ‘सी’,‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. अगदी यकृतावरच ते हल्ला करत असल्याने या साथीपासून बळी जाणाºयांची संख्या मोठी आहे. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. अशा रु ग्णांत तातडीने रक्त बदलणे हाच पर्याय ठरतो. ‘हेपॅटायटीस बी’ हा आईकडून मुलाकडे, बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हिपॅटायटीस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रॉन्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रु ग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग झालेला असतो.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांनी सांगितले, ‘हेपॅटायटीस बी’ हा हळूहळू वाढत जाणारा आजार असून त्याचा यकृतावर परिणाम होतो. या आजाराच्या रुग्णाला ४५ ते १६५ दिवस ताप, उलटी आणि कमी भूक लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते. हा एक ‘डीएनए व्हायरस’चा संक्रमणाचा आजार आहे. जो एक-दुसऱ्याच्या शारीरिक संपर्कातून आणि रक्तातून पसरतो. ‘हेपॅटायटीस बी’ हे आजारातील मृत्यूचे तिसरे मुख्य कारण ठरत आहे.मद्यपींसाठी धोकादायक‘हेपॅटायटीस बी’वर उपचार घेतल्यानंतर स्टेरॉईड घेणारे किंवा दारूचे सेवन केल्यास हा आजारा पुन्हा उफाळून येतो. १२ मधून एका व्यक्तीला हा आजार दिसून येत असलातरी ‘पॉझिटीव्ह’ व्यक्तीचे यकृत निकामी होतेच असे नाही. साधारण १०० रुग्णांमधून सात ते आट टक्के लोकांचे यकृत निकामी होण्याची शक्यता असते.लसीकरण आवश्यक‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे हा आजार एचआयव्हीपेक्षा भयंकर मानला जातो. असे असतानाही याच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला गंभीरतेने घेतले जात नाही. यामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ‘हेपॅटायटीस बी’चा समावेश होणे आवश्यक आहे, असे झाल्यास या रोगामुळे होणारा ‘लिव्हर कॅन्सर’, ‘लिव्हर सिरोसीस’चे प्रमाण कमी होईल.-डॉ. अमोल समर्थप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर