शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नागपुरात सिमेंट रस्ते असलेल्या भागातच जास्त खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 10:03 IST

नागपुरात लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे.

ठळक मुद्देहॉटमिक्स विभागाचा अजब दावा खड्डे बुजवलेल्या भागात अधिक खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने शहरातील खड्ड्यांची समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी शहरात सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेतलेली आहेत. लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. तसेच हॉटमिक्स विभागाने सर्वाधिक खड्डे बुजवलेल्या याच भागात अधिक खड्डे आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पावसाळा सुरू झाला की डांबरी रस्ते उखडून रस्त्यावर खड्डे पडतात. खड्ड्यामुळे अपघात होतात. वाहन चालकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या चार वर्षात महापालिकेने जवळपास ५०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र,सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत. परंतु २२७१ किलोमीटरपैकी २१७२ किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे असल्याने शहरातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेचीच आहे. गेल्या ११ महिन्यात हॉटमिक्स विभागाने शहरात १० हजार ८३८ खड्डे शोधून काढले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणचे खड्डे काही महिन्यांपूर्वी बुजविण्यात आले होते, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झालेले आहेत. खड्डे बुजवण्यावर दरवर्षी १० ते १२ कोटींचा खर्च करूनही पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.नागपूर शहरातील सर्वच भागात खड्ड्यांची समस्या निर्माण होते. याचा विचार करता शहरात तीन टप्प्यात सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्प्यातील रस्ते जवळपास पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रस्ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तिसºया टप्प्यातील रस्त्यांनाही सुरुवात झाली आहे. यात लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन इतर झोनच्या तुलनेत आघाडीवर आहेत. या भागातील डांबरी रस्त्यांवरील खड्डेही अधिक बजुवण्यात आले आहे,असे असूनही या झोनमध्ये खड्ड्यांची संख्या अधिक आहे.१ एप्रिल २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ पर्यंत महापालिकेने १० हजार ८३८ खड्डे शोधून काढले आहेत. झोननिहाय आकडेवारीनुसार लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १,७८७ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या झोनमधील प्रभाग ३६, ३७ व ३८ मधील खड्डे अजूनही कायम असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे केलेल्या आहेत. त्यामुळे या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक