शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

नागपूर रडार कंट्रोल एरियामधून अधिक उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:52 IST

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले एअरबेस बंद केले आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे रुट बदलले आहे.

ठळक मुद्देएअरपोर्ट आथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले एअरबेस बंद केले आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे रुट बदलले आहे. यापैकी बहुतांश विमाने ही नागपूर रडार कंट्रोल एरियामधून जात आहेत. नागपूर एअरपोर्टवर वायु वाहतूक नियंत्रण आणि नेव्हीगेशनची जबाबदारी संभाळणाऱ्या एअरपोर्ट आथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून तयारीत आहे.नागपूर एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल एरिया हा नागपूरच्या चारही बाजूंनी ६०० नॉटिकल मॉईलच्या रेंजमध्ये पसरला आहे. या कंट्रोल एरियामधून दररोज जवळपास १३५५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय उड्डाणांची ये-जा होत असते. बुधवारी सकाळी ही संख्या अचानक वाढली. मध्य भारतात मोठा कंट्रोल एरिया असलेले नागपूर एअरपोर्ट अनेक सुविधांनीही सज्ज आहे. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही पूर्णपणे सक्षम आहे. बुधवारी सकाळी श्रीनगर, जम्मू, लेह, पठाणकोट, अमृतसह, शिमला, कांगडा, कुल्लू, मनाली आणि पिथोरगड विमानतळावरील संचालन बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना होती. त्यामुळे रुट बदलण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर एअरपोर्टवरही काही विमानांचे लँडिंग केले जाऊ शकते. या सर्व गोष्टी पाहता रडार कंट्रोलमध्ये एएआयच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यावर चर्चा केली. यानंतर मिहान इंडिया लि. (एमआयएल)च्या फायर कंट्रोललाही तयारीसंबंधात अवगत करण्यात आले आहे.

एअर ट्रॅफिकवर लक्षपरिस्थिती विचारात घेता ‘मॅन पॉवर’ वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर ट्रॅफिकमध्ये होणाºया बदलांवर लक्ष ठेवले जात आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता विमानतळाशी नियमित संपर्क साधला जात आहे. सिव्हील एव्हिएशन को-आर्डिनेशन सोबत सुरू आहे.- युधिष्ठिर साहू, विमानतळ संचालक, एएआय 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर