नागपूर : अकरावीत प्रवेशाची अखेरची मुदत मंगळवारी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी समोर आली आहे. शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील २४ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. विज्ञान शाखेतील रिक्त जागांची संख्या साडेआठ हजारांहून अधिक आहे.
१२ आॅगस्ट रोजी अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. शून्य फेरी, तीन मुख्य, दोन विशेष आणि दोन प्रथम प्राधान्य फेऱ्यांनंतर ३४ हजार ७९९ जागांवरच प्रवेश झाले. २४ हजार ४५१ जागा रिक्त राहिल्या आहेत. पाडण्यात आल्या. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ हजार ७३१ जागा रिक्त राहिल्या आहेत. वाणिज्य व कला शाखेतील रिक्त जागांची संख्या अनुक्रमे ७ हजार ९६३ व ५ हजार ६४५ इतकी आहे.
महाविद्यालयांसमोर अडचण
अगोदरच ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यातच आता रिक्त जागांचा आकडा मोठा असल्याने चिंता आणखी वाढीस लागली आहे.
शाखानिहाय प्रवेश व रिक्त जागा
शाखा-प्रवेश-रिक्त जागा
कला-४,०१४- ५,६४५
वाणिज्य-१०,०३७-७,९६३
विज्ञान-१८,७२९-८,७३१
एमसीव्हीसी-२,०१८-२,११२