शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:53 IST

एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.

ठळक मुद्देउत्पन्नही ५.७७ कोटीने वाढले : खासगी वाहतुकीशी टक्कर देण्यासाठी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्क दयानंद पाईकरावनागपूर : एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.खासगी प्रवासी वाहतुकीच्या बसेसमध्ये अधिकाधिक सुविधा मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत होते. परंतु स्पर्धेच्या युगात आपण मागे राहू नये यासाठी एसटी महामंडळाने आत्मचिंतन करून प्रवासी आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी अनेक उपक्रम राबविले. यात नागपूर विभागात ११ मार्गावर दर अर्ध्या तासाने शटल सेवा, डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित शिवशाही बसेस, नॉन स्टॉप बसेसची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून दिली. याचाच परिणाम म्हणून तब्बल १९ लाख ६ हजार नव्या प्रवाशांनी एसटीवर आपला विश्वास दाखवून एसटीने प्रवास केल्याची माहिती महामंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. २०१६-१७ या वर्षी ६ कोटी ३५ लाख २५ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता, तर २०१७-१८ या वर्षी ६ कोटी ५४ लाख ३४ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यात एसटीच्या नागपूर विभागाच्या उत्पन्नात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने मारलेल्या या बाजीसाठी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाने एका पत्राद्वारे नागपूर विभागाचे अभिनंदन केले आहे. एसटीच्या नागपूर विभागाने १९ लाख नवे प्रवासी जोडले हे खरे आहे. परंतु प्रवाशांना सातत्याने चांगली सेवा पुरविण्याची आणि जोडल्या गेलेले प्रवासी टिकवून ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या नागपूर विभागावर येऊन ठेपली असून त्यात नागपूर विभाग कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरविणार आहे.सांघिक कामगिरीची फलश्रुती‘एसटी महामंडळाचे नागपूर विभागातील प्रवासी १९ लाखानी वाढले. उत्पन्नही ५.७७ कोटीने वाढले. या यशामागे नागपूर विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम असून सांघिक कामगिरी केल्यामुळेच हे यश गाठता आले.’-चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, नागपूर विभाग. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळBus Driverबसचालक