शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १५ मीटरहून अधिक उंच व जुन्या इमारतींना ‘फायर अलर्ट ’यंत्रणा बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:32 IST

शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देअग्निशमन व विद्युत समितीचा निर्णयत्रिमूर्ती नगरात नवीन स्थानक

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.महापालिके च्या अग्निशमन विभागाकडे ‘फायर अलर्ट’ हॉटलाईन सिक्युरिटी यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारती या यंत्रणेशी जोडलेल्या नाही. त्यामुळे आता १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या जुन्या व नवीन इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रस्तावाला अग्निशमन व विद्युत समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.फायर सेफ्टी अ‍ॅक्टनुसार ज्या इमारतींची उंची १५ मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. आता त्यात फायर अलर्ट हॉटलाईन सिक्युरिटी सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे त्या इमारतींची सर्व माहिती अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असणार आहे. टाकीतील पाणी, अग्निशमन सेवा याचाही त्यात समावेश असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. यावेळी सभापती संजय बालपांडे, उपसभापती प्रमोद चिखले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर व सदस्य उपस्थित होते.अग्निशमन विभागामार्फ त शहरातील विहीर सफाईचे काम केले जाते. यावर लाखौं रुपयांचा खर्च विभागाला करावा लागतो. ही जबाबदारी आरोग्य विभागावर सोपविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सरकारी विहिरी या मोफत साफ करण्यात याव्यात. खासगी विहिरींकरिता नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.त्रिमूर्ती नगरात नवीन स्थानकत्रिमूर्ती नगरात नव्याने अग्निशमन स्थानकाची इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे बांधकाम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यासोबतच वाठोडा, गंजीपेठ येथील स्थानकांच्या इमारतीचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.

 

टॅग्स :fireआग