शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठातील अत्याधुनिक ‘जिम’ भाडेतत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:20 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र विद्यापीठात ही व्यायामशाळा चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करुन ती भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप उपस्थित केले असून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी : करारनाम्यावर प्रश्न उपस्थित

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र विद्यापीठात ही व्यायामशाळा चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करुन ती भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप उपस्थित केले असून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागात अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संबंधित व्यायामशाळा आम्हीच चालवू, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला होता. मात्र मनुष्यबळ नसल्याचे कारण देत ही व्यायामशाळा भाडेतत्त्वावर बाहेरील व्यक्तीला चालवायला देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. विशेष म्हणजे ३१ मे २०१८ रोजी कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ रोजी संबंधित करारनाम्याला विशेषाधिकारात मान्यता दिली. करारनाम्यानुसार प्रमोद वानखेडे यांना ही व्यायामशाळा चालविण्यासाठी देण्यात आली.या करारानाम्याला मान्यता मिळावी यासाठी हा विषय मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी या करारनाम्यावर प्रश्न उपस्थित केले. व्यायायशाळा भाडेतत्त्वावर देण्याअगोदर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती का असे विचारत कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र याबाबतची कागदपत्रे प्रशासनातर्फे पुरविण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेर हा विषय गुरुवारी चर्चेला यावा, असे ठरले. विद्यापीठाने समिती गठित करुन अद्ययावत व नामांकित व्यायामशाळा चालकांना निविदा प्रक्रियेद्वारे आमंत्रित करावे. त्यातून मिळणारा महसूल विद्यार्थी कल्याण व क्रीडा सुविधा विकासासाठी वापरण्यात यावा, अशी सूचना यावेळी विष्णू चांगदे यांनी केली.विशेषाधिकाराचा उपयोग का ?साधारणत: विद्यार्थी हिताच्या व प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींसाठी कुलगुरूंकडून विशेषाधिकाराचा वापर करण्यात येतो. मात्र व्यायामशाळेच्या करारनाम्याला मान्यता देणे ही अत्यावश्यक बाब खरोखरच होऊ शकते का, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्य नाहीदरम्यान, विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यायामशाळेत सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जात नाही. सोबतच ही व्यायामशाळा चालविणाऱ्यांनी स्वत:च्या नावाचे फलकदेखील तेथे लावले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी हटकल्यानंतर ते फलक काढण्यात आले. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता सर्व विद्यार्थ्यांना कमी दरात व्यायामशाळा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे गुरुवारी व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर