शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमध्ये आले हाडांच्या चाचणीकरिता अद्ययावत ‘डेक्सा स्कॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:14 IST

हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ उपकरण सोमवारपासून मेडिकलमध्ये सेवेत दाखल झाले आहे.

ठळक मुद्देमेडिसीन विभागाकडे जबाबदारी

आॅनलाईन लोकमतनागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘आॅस्टिओपोरोसिस’ चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ शकते. ‘डेक्सा स्कॅन’ या चाचणीद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा या सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ उपकरण सोमवारपासून मेडिकलमध्ये सेवेत दाखल झाले आहे.तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले ‘डेक्सा स्कॅन’ म्हणजेच ‘ड्युअल एनर्जी एक्सरे अ‍ॅब्लॉस्प्रिओमिटरी’. या उपकरणामुळे आता एका क्लिकवर हाडांची घनता मोजणे शक्य झाले आहे. मेडिकलमधील मेडिसीन विभागाच्या अपघात विभागात सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या उपस्थितीत हे उपकरण सेवेत दाखल झाले. यावेळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र बन्सोड उपस्थित होते. या अद्ययावत निदान उपकरणामुळे आॅस्टिओपॅनिया, आॅस्टिओपोरोसिस आणि रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या  रुग्णांची सोय होणार आहे. ‘डेक्सा स्कॅन’मुळे रुग्णाला पॅथॉलॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासणार नाही. शिवाय एक्स-रेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्ग देखील अत्यंत कमी स्वरूपात असतो.रुग्णसेवेत यायला लागले नऊ महिनेमेडिकलमध्ये कार्यान्वित १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी करण्यात आली होती. हे यंत्र फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये उपलब्ध झाले. परंतु उपकरणाला आवश्यक असलेले साहित्य व तंत्रज्ञ उपलब्ध न झाल्याने तब्बल आठ महिने हे यंत्र डब्यात बंद होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :nagpurनागपूर