शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमआरआय’ साठी महिनाभराचे वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 10:26 IST

नेहमीच दुखणाऱ्या गुडघ्याच्या निदानासाठी डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले, परंतु नागपूर मेडिकलच्या क्ष-किरण विभागाने या तपासणीसाठी तब्बल एक महिन्यानंतरची तारीख दिली.

ठळक मुद्देकसे होतील तातडीने उपचार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेहमीच दुखणाऱ्या गुडघ्याच्या निदानासाठी डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले, परंतु मेडिकलच्या क्ष-किरण विभागाने या तपासणीसाठी तब्बल एक महिन्यानंतरची तारीख दिली. यामुळे डॉक्टरही उपचार करण्यास हतबल झाले. गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्येच रोगाच्या निदानासाठी उशीर होत असेल तर तातडीने उपचार होणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे अद्ययावत यंत्रणा व विविध विभाग उघडले जात असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन हजाराची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) आज तीन हजारावर गेली आहे. परंतु आहे त्या सोयींवर मेडिकलचा डोलारा उभा असल्याने रुग्णसेवा अडचणीत येत आहे. दुसरीकडे नवनवे आजार, आजाराची गुंतागुंत यामुळे अद्ययावत यंत्रणेचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, आता प्रत्येक मोठ्या रुग्णालयात ‘एमआरआय’ महत्त्वाचे झाले आहे. असे असताना विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हे उपकरण उपलब्ध आहे. परिणामी, या उपकरणावर रुग्णांचा भार वाढला आहे. यातही २०-२५ एमआरआय रोज होत आहेत. मात्र त्यानंतरही प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. सध्या महिनाभराची तर कुणाला दीड महिन्यापर्यंतची तारीख दिली जात आहे.विनंती करूनही नाही मिळाली जवळची तारीखगुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी एका रुग्णाने २२ जानेवारी रोजी मेडिकल गाठले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘एमआरआय’ करण्याचा सल्ला दिला. क्ष-किरण विभागातील परिचारिकेने त्यांच्या केसपेपरवर एक महिन्यानंतरची म्हणजे २२ फेब्रुवारीची तारीख दिली. त्या रुग्णाने दुखणे सहन होत नसल्याचे सांगून जवळची तारीख देण्याची विनंती केली. यावर परिचारिकेने प्रत्येकाचा हाच बहाणा असल्याचे सांगत आणि अर्धा तास उशीर केल्यास दीड महिन्यानंतरची तारीख मिळेल, असे सांगून परत पाठवून दिले.दोनच तंत्रज्ञांमुळे सायंकाळी बंद होते एमआरआयसूत्रानुसार, रेडिओलॉजी विभागात ‘एमआरआय’ काढण्यासाठी दोनच तंत्रज्ञ आहेत. यामुळे सकाळ व दुपार या दोनच पाळीत हे उपकरण सुरू असते. सायंकाळी ७ वाजेनंतर ‘एमआरआय’ बंद केला जातो. यामुळे दोन पाळीत २०-२५ एमआरआय रोज होतात.

टॅग्स :Healthआरोग्य