शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

जागतिक संत्रा महोत्सव होणार जानेवारी महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:18 IST

नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. लोकमत समूहाच्या पुढाकाराने मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.१८ ते २१ जानेवारीदरम्यान येथील सुरेश भट सभागृहात हा महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भक्कम पाठिंब्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समृद्धीत भर घालणाºया या उपक्रमाबद्दल शेतकºयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात एक बैठक घेतली. बैठकीला महापौर, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकºयांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकºयांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली.आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाºयांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महानगरपालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.