शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे.

प्रतीक्षा पावसाची : १.५ लाख हेक्टरवर नियोजननागपूर : मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे. कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुबलक बियाणे व खताचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्र असून कापूस १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमूग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी यंदा कृषी विभागाने ८३ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली आहे. शिवाय २ हजार ७०० क्विंटल बीटी कापूस, ३१ हजार ५०० क्विंटल भात, ७५० क्विंटल भुईमूग, १ हजार ६०० क्विंटल संकरित ज्वारी व २ हजार ७०० क्विंटल तूर बियाणे मागितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार त्यापैकी जिल्ह्यात सोयाबीनचे ४६ हजार ९६८ क्विंटल बियाणे पोहोचले आहे. तसेच कापसाचे २ हजार २१२, भात ८ हजार ९६५, संकरित ज्वारी ६०२ क्विंटल व तूर १ हजार १० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. याशिवाय उर्वरित पुरवठाही लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागातर्फे ‘मागेल त्याला बियाणे’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकुर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाने त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना कापूस, तूर व मका पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खत-बियाणे महागले यंदा खत व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल मिळणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या किमती ७ हजार ९५० रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच धानाच्या किमती ४ हजार ५०० रुपयांवरून ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्याच्या किमती ९ हजार ५०० रुपयांवरून १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खताच्याही किमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकऱ्याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे. सोयाबीनला कापसाचा पर्याय कापूस विदर्भातील प्रमुख पीक समजल्या जाते. गतवर्षी नागपूर विभागात सुमारे ३ लाख २ हजार ९९ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. परंतु यंदा त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, कृषी विभागाने ३ लाख २४ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे ८ हजार १६८ पॉकिट बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यानुसार महाबीज व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या बियाण्याची पूर्तता केली जाणार आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यासाठी १.५ लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची उगवण तपासणी -सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी.-किमान ७० टक्के उगवण शक्तीचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाण्याची पेरणी करावी. -उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाण्याचे प्रति हेक्टरी प्रमाण वाढवावे. -टोकन पद्घतीने बियाणे पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते. -सोयाबीनवर बीज प्रक्रिया करूनच त्याची पेरणी करावी.