शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

पावसाळी अधिवेशन शेतकरीकेंद्रित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:02 IST

शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको घोटाळ्यावरून विरोधकांनी दंड थोपटले असताना सत्ताधाऱ्यांकडूनदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांनी नागपुरात होणारे पावसाळी अधिवेशन हे शेतकरीकेंद्रित असेल व शेतकऱ्यांच्या समस्येवर सखोल चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : विरोधकांच्या अफवांना राजकीय उत्तर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको घोटाळ्यावरून विरोधकांनी दंड थोपटले असताना सत्ताधाऱ्यांकडूनदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांनी नागपुरात होणारे पावसाळी अधिवेशन हे शेतकरीकेंद्रित असेल व शेतकऱ्यांच्या समस्येवर सखोल चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून सरकारची अधिवेशनाची धोरणे काय असतील यावर प्रकाश टाकला. अधिवेशनात २७ विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. राज्याचे दूध धोरणदेखील याच अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू असून आणखी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पीककर्जाच्या वाटपालादेखील वेग येतो आहे. जोपर्यंत अखेरच्या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नांवरदेखील चर्चा करण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले. मुंबई विकास आराखड्यासंदर्भात विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. मात्र या आराखड्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतलेला नाही तर त्यासाठी विशेष समिती नेमली होती. या आराखड्यासंदर्भात शासनाची भूमिका पारदर्शक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रामुख्याने उपस्थित होते.धुळ्याचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टातधुळ्याची घटना ही गंभीर असून अफवांचे त्यानंतर पेव फुटले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात लवकरात लवकर निकाल यावा, यासाठी ते फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अंधेरी दुर्घटनाप्रकरणी ‘ब्लेमगेम’ नकोअंधेरी रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. या घटनेची चौकशी होणे जास्त आवश्यक आहे. ‘ब्लेमगेम’ करण्याची ही वेळ नाही. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर सर्व पुलांच्या ‘आॅडिट’चे निर्देश देण्यात आले होते. अंधेरी येथे ‘आॅडिट’ झाले होते का, जर ‘आॅडिट’ झाले होते तर कार्यवाही काय झाली, नसेल झाली तर का नाही झाली याची उत्तरे चौकशीत शोधण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अफवांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृतीविरोधी पक्षांकडूनदेखील धनगर आरक्षण तसेच इतर संवेदनशील बाबींबाबत खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. त्यांच्या अफवांना राजकीय उत्तरच देण्यात येईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला. राज्यात अफवांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून ‘सोशल मीडिया’चीदेखील मदत घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संवेदनशील ‘पोस्ट’ समोर पाठविण्यापूर्वी ती नागरिकांनी तपासून घ्यावी. कायद्यानुसार असे ‘पोस्ट’ समोर पाठविणे हा गुन्हा ठरतो, असे फडणवीस यांनी सांगितले.ही माझी पत्रपरिषद आहेपत्रपरिषदेदरम्यान नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विचारणा करण्यात आली. नाणारबाबत शिवसेनेची भूमिका आम्ही समजून घेतली आहे. कुणावरही हा प्रकल्प लादण्यात येणार नाही. चर्चेने यात तोडगा काढू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योगमंत्र्यांना विचारणा केली असता, ही माझी पत्रपरिषद असून ते त्यांचे म्हणणे वेगळे मांडतील, असे म्हणत मुख्यमंत्री दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.तूर व चणा डाळीची विक्रमी खरेदीशेतकऱ्यांकडून तूर व चणा डाळीची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये २ लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांकडून १ हजार ८३५ कोटींची तूर डाळ खरेदी करण्यात आली. तर १ लाख ४० हजार शेतकऱ्याकडून १ लाख ९४ हजार ६२६ टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मागील सरकारने १४ वर्षांत ४२६ कोटींच्या धान्याची खरेदी केली. आम्ही तीन वर्षांतच ८ हजार कोटी रुपयांच्या धान्याची खरेदी केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी