शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून १० दिवस उशिरा? ऊन-सावलीचा खेळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:39 IST

सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात.

ठळक मुद्देपावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणत: ७ ते ८ जूनदरम्यान मान्सून विदर्भात पोहचतो. परंतु यंदा मान्सूनचे ढग विदर्भात उशिराने पोहचण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे हा परिणाम झाला असून पावसासाठी आणखी १० दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.नागपुरात ८ ते १० जूनदरम्यान मान्सून सक्रिय होतो. सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात. हवामान खात्यानुसार मागील चार दिवसात मान्सूनचा वेग मंदावला आहे. बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचे ढग गती घेतील. या बदलामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे ११ व १२ जून रोजी पाऊस येण्याची शक्यता आहे. यावर्षी नवतपाच्या मध्यातूनच मान्सूनपूर्व स्थिती चांगली झाली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. यंदा मध्य भारतात १०३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील वर्षी २२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. जूनच्या महिनाअखेरीस काही दिवसच पाऊस झाला होता. तर जुलै महिना बहुतांशपणे कोरडा गेला होता. त्यानंतर मात्र जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान, सोमवारी नागपुरात पारा वाढला. दुपारपर्यंत चांगले ऊन पडले होते. दुपारी २.४५ च्या सुमारास ढग दाटून आले.

टॅग्स :Rainपाऊस