शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कोरोना लसीचा प्रयोग स्वत:वर करून माकडे विदर्भात परतली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:09 AM

नागपूर : कोरोना लसीचा रिसर्च करण्यासाठी सुमारे ६ महिन्यांपूर्वी विदर्भातून माकडे पकडून नेण्यात आली होती. त्या माकडांना लस टोचून ...

नागपूर : कोरोना लसीचा रिसर्च करण्यासाठी सुमारे ६ महिन्यांपूर्वी विदर्भातून माकडे पकडून नेण्यात आली होती. त्या माकडांना लस टोचून त्यांच्यावरील रिसर्च यशस्वी झाल्यानंतर, ही माकडे पुन्हा विदर्भातील त्यांच्या मूळ अधिवासात परतली आहेत. अर्थात, त्यांना परत आणण्यात आले आहे.

कोरोना संक्रमणावर उपाय म्हणून लस बनविण्याचे काम सुरू असताना, संशोधनासाठी काही माकडे विदर्भातील जंगलातून पकडून नेण्यात आली होती. राज्याच्या मुख्य वनजीव रक्षकांच्या परवानगीनंतरच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये त्यांना अगदी कडोकोट सुरक्षेत नेण्यात आले होते. तेथील वैद्यकीय कोविड १९च्या विषाणूवर संशोधन करून, लस लवकर तयार करण्यासाठी माकडांवर लसीचे प्रयोग केले. संशोधनानंतरही ही माकडं सुरक्षित आहेत. त्याच्यावरील संशोधनानंतरच लसीची सुरक्षा पटली, त्यामुळे लस आली.

ही कार्यसिद्धी झाल्याने पुणे येथील प्रयोगशाळेमधून शनिवारी काही माकडांना परत नागपुरात आणण्यात आले. त्यांच्यावरील संशोधन संपल्याने व यशस्वी झाल्याने, या माकडांना परत त्यांच्या मूळ अधिवासात सोडायला डाॅक्टर तज्ज्ञांची चमू आली होती. ट्रान्झिट सेन्टर या मदतीने या माकडांना त्यांच्या मूळ अधिवासात मुक्त करण्यात आले. जंगलात नेऊन पिंजऱ्याचे दार उघडताच, आनंदाने उड्या मारत या माकडांनी जंगलाकडे धूम ठोकली.