शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त; हिमाचलच्या धर्तीवर राज्यातही योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:06 IST

कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला. माकडे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंब्यापासून भाजीपाल्यांचे अतोनात  नुकसान करणाऱ्या कोकणातील माकडांचा- वानरांच्या उच्छादावर  कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला. माकडे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतीचे नुकसान झाले तर नुकसानभरपाईही मिळत नाही, कारण नक्की कशामुळे नुकसान दाखवणे हे सरकारी यंत्रणेला पटवून देणे अशक्यप्राय होते. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात अनेक आंदोलने झाली, मात्र त्यातून मार्ग निघालेले नाही. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक माहिती दिली. 

मंजुरीसाठीचा केंद्राला पाठविणार प्रस्तावनुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत दोन मुद्दे प्रामुख्याने समोर आले. त्यातील एक म्हणजे नुकसानभरपाई देणे आणि दुसरा माकडांचा बंदोबस्त करणे. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांची नसबंदी करण्याची योजना हा दुसरा पर्याय आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या योजनेचा फायदा झाला आहे. त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता आहे. तशी मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठविणार आहोत. हिमाचल प्रदेशाला मंजुरी मिळाली मग आम्हालाही केंद्र सरकार देईल, असा विश्वास यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

कोकणात माकड प्राणी हे उपद्रवी ठरले आहेत. शेती, फळबागांचे व घरांचे मोठे नुकसान करतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक समिती नेमली होती. 

टॅग्स :Monkeyमाकड