शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाकू मारून रक्कम हिसकावून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:37 IST

ओळखीच्या व्यक्तीच्या घरात शिरलेल्या चार आरोपींनी एका तरुणाला चाकू मारून पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीच्या खिशातून पाच हजार रुपये हिसकावून नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओळखीच्या व्यक्तीच्या घरात शिरलेल्या चार आरोपींनी एका तरुणाला चाकू मारून पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीच्या खिशातून पाच हजार रुपये हिसकावून नेले.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंद्रनगर न्यू नरसाळा परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली.हरिभाऊ नानाजी नानोटकर (वय ५३) हे इंद्रनगरात राहतात. सोमवारी रात्री ७.३०च्या सुमारास नानोटकर, त्यांचा मुलगा अमर आणि अमरचा मित्र संदीप मस्के हे तिघे गप्पा करीत असताना कुख्यात गुन्हेगार कुणाल पांडुरंग उज्जैनकर (वय ३१, रा. इंद्रनगर) तसेच त्याचे साथीदार मनीष जळगावकर, मनोज फरांडे आणि कार्तिक असे चौघे जण दारूच्या नशेत टुन्न होऊन नानोटकर यांच्या घरात शिरले. ओळखीचे असल्यामुळे आणि दारूच्या नशेत दिसल्यामुळे नानोटकर यांनी त्यांना विरोध केला नाही. आरोपींनी घरात शिरताच शिवीगाळ सुरू केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पंधरा हजार रुपये उपचाराचा खर्च आला होता, ती रक्कम पाहिजे, असे सांगून नानोटकर यांना शिवीगाळ सुरू केली. रक्कम मिळावी म्हणून ते धमकावत होते. त्यामुळे नानोटकर यांच्या मुलाचा मित्र संदीप याने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी चाकू काढून त्याला मारला. त्यानंतर हरिभाऊ यांना धमकावून पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला असता त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाल्यामुळे आरोपी पळून गेले. नानोटकर यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी कुणाल उज्जैनकर याला अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी