शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

धन गुरू नानक सारा जग तारिया

By admin | Updated: November 27, 2015 03:20 IST

कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली.

गगनभेदी जयघोषांनी निघाली शोभायात्रा : गुरू नानकदेव यांची ५४६ वी जयंतीनागपूर : कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू सहभागी झाले होते. याप्रसंगी गुरू नानकदेवांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. दुपारी १ वाजता अतिथी व श्रद्धाळूंच्या उपस्थितीत पूजाअर्चना करण्यात आली. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेत गुरू ग्रंथ साहेबांचा मनमोहक रथ होता. बँडपथक, आतषबाजीच्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. भाविकांतर्फे मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुष्पहार आणि प्रसाद समर्पित करण्यात येत होता. मनमोहक रथासमोर युवक नृत्याचा फेर धरून आनंद व्यक्त करीत होते. यावेळी गुरू अंगददेव, गुरू अमरदास, गुरू रामदास, गुरू अरजनदेव, गुरू हरगोविंद, गुरू हरिराय साहेब, गुरू हरिकिशनदेव, गुरू तेगबहादूर, गुरू गोविंदसिंग, मां भगवती आदींच्या विहंगम दृष्यांचे रथ होते. परिश्रमाने मिळवलेले धनच खरे धन आहे, असा संदेश देणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. अकराही गुरूंच्या संदेशाचे चित्ररथ शोभायात्रेत असल्याने भाविक श्रद्धेत चिंब झाले. शोभायात्रेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माधवदास ममतानी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शोभायात्रेला महापौर प्रवीण दटके, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, आ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, नगरसेवक सुरेश जग्यासी, प्रकाश तोतवानी, गिरीश व्यास, प्रतिभाताई मेंढरे, जयप्रकाश गुप्ता, वीरेंद्र कुकरेजा, अतुल कोटेचा, पीआय संजय सांगोडे, रमेश वानखेडे आदींनी भेट देऊन पूजन केले.(प्रतिनिधी)