लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी शुक्रवारी त्यांच्या राहाटे कॉलनी येथील यवतमाळ हाऊस या निवासस्थानी दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. हास्यविनोद आणि मनमोकळ्या गप्पांनी स्नेह मिलनाची ही मैफल रंगली होती. अशाच एका क्षणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मिठाई खाऊ घातली आणि दिवाळीच्या दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या स्नेहमिलनात राज्यातील राजकारण, समाजकारण, उद्योग, क्रीडा, शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राजकारणाच्या धावपळीतून वेचलेले आनंदाचे क्षण; यवतमाळ हाऊसवर रंगले दिवाळी स्नेहमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:22 IST