शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग; जवानाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:21 IST

नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली.

ठळक मुद्देझोपेत असल्याचा घेतला गैरफायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली. याप्रकरणी संबंधित महिला प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले आहे.अर्चना (बदललेले नाव) (३०) रा. सिकंदराबाद या व्यवसायाने सिकंदराबादला शिक्षिका आहेत. त्या राजधानी एक्स्प्रेसच्या कोच बी-१०, बर्थ ६० वरून नवी दिल्ली ते सिकंदराबाद प्रवास करीत होत्या. याच कोचमध्ये ५७ क्रमांकाच्या बर्थवरून आरोपी संदीप रामचंद्र (२६) रा. हरियाणा हा प्रवास करीत होता. आरोपी हैदराबादला सैन्यदलात आर्टी सेंटरमध्ये काम करतो. त्याने गुरुवारी रात्री ११.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ असताना झोपेचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग केला. घडलेल्या घटनेमुळे संबंधित महिला प्रवासी घाबरली. एकटीच प्रवास करीत असल्यामुळे तिने तातडीने गाडीतील टीटीईला भेटून घडलेला प्रकार सांगितला. टीटीईच्या मदतीने या महिला प्रवाशाने आपला बर्थ बदलवून घेतला. त्यानंतर या घटनेची माहिती हेल्पलाईनच्या साहाय्याने लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. राजधानी एक्स्प्रेस सकाळी १०.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येताच सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, महिला कॉन्स्टेबल अश्विनी रिंके यांनी महिलेचे बयाण नोंदवून घेतले. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला गाडीखाली उतरवून घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

 

टॅग्स :Molestationविनयभंग