शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:09 IST

खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होती.

ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर गुन्हा दाखल : आरोपी मॅनेजरला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होती.अभिजित राहाटे (३५) असे आरोपीचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीनुसार अभिजित तिच्याशी द्विअर्थी भाषेत बोलत होता. वरिष्ठ असल्याने ती सर्व सहन करीत होती. मार्च महिन्यात अभिजितने तिला आणि इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष समाप्तीचे कारण सांगून सुटीच्या दिवशीही कामावर बोलावले. तिथे तिला एकटी पाहून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. यानंतर अभिजित तिला नियमित त्रास देऊ लागला. महिलेनुसार अभिजित तिच्याशी इतरांसमोरही असभ्य वर्तणूक करू लागला. विरोध केल्यास नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. पीडित महिलेने याबाबत आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितले. नाईलाजास्तव मे मध्ये तिने नोकरीचा राजीनामा दिला, तसेच याबाबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. कर्यालयातील इतर कर्मचारी, महिला सहकाºयांना विचारपूस केली. परंतु त्यांनी कुठलीही ठोस माहिती दिली नाही. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला तसेच आरोपीला ताब्यात घेतले. अभिजितने मात्र त्याच्यावरील आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.घरात घुसून विनयभंग व मारहाणजरीपटका येथे एका तरुणीच्या घरात घुसून विनयभंग व मारहाण करण्यात आली. गड्डीगोदाम येथील ३५ वर्षीय सचिन गुणवंतराव धोंगळे हा मंगळवारी रात्री २० वर्षीय तरुणीच्या घरी आला. दरवाजा बंद करून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार करू लागला. विरोध केला असता मारहाण केली. जरीपटका पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली.

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटक