शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात छेड काढून विद्यार्थिनीला झापड मारली; सडकछाप मजनू कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 20:12 IST

Nagpur News रस्त्याने जात असलेल्या एका विद्यार्थिनीला दुचाकीचा जाणीवपूर्वक हॅण्डल (कट) मारून दोन सडकछाप मजनूंनी तिची छेड काढली. विद्यार्थिनीने विरोध करून जाब विचारला असता आरोपीने तिला झापड मारली.

 

नागपूर : रस्त्याने जात असलेल्या एका विद्यार्थिनीला दुचाकीचा जाणीवपूर्वक हॅण्डल (कट) मारून दोन सडकछाप मजनूंनी तिची छेड काढली. विद्यार्थिनीने विरोध करून जाब विचारला असता आरोपीने तिला झापड मारली. भारत माता चाैकातील जागृतेश्वर मंदिराजवळ सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.

१६ वर्षीय विद्यार्थिनी तिच्या एका मैत्रिणीसह रस्त्याने पायी जात होती. आरोपी राजेश सुंदरलाल ढोके (वय ४४, रा. जागनाथ बुधवारी, कुंभारपुरा) आणि चंदू विठ्ठलराव लारोकर (वय ३८, रा. तीननल चाैक) हे दोघे दुचाकीने आले. त्यांनी पीडित विद्यार्थिनीला जाणीवपूर्वक दुचाकीचा हॅण्डल (कट) मारला. त्यामुळे विद्यार्थिनीने आरोपीला विरोध करून जाब विचारला. त्यावर निर्ढावलेल्या ढोके आणि लारोकरने आपल्या मुलीच्या वयाच्या या विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करून तिला झापड मारली. या प्रकारामुळे आजूबाजूची मंडळी गोळा झाली. वातावरण गरम झाले असतानाच गस्तीवर असलेले बिट मार्शला तेथे पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनींची विचारपूस करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना तहसील पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार जयेश भांडारकर यांनी पीडित विद्यार्थिनींना धीर दिला. त्यांच्या पालकांशी संपर्क केला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीची तक्रार नोंदवून घेत आरोपी ढोके आणि लारोकरला अटक केली.

----

टॅग्स :Molestationविनयभंग