शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मोहम्मद शमी प्रकरणाचे  नागपुरातील दहेगाव कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 14:32 IST

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, याला खापरखेडा पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देदिल्ली पोलीस चौकशीसाठी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, याला खापरखेडा पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मोहम्मद शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपांपैकी एक तरुणी ही दहेगाव (रंगारी) येथील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिचे वडील ट्रकचालक असून, तिने कोराडी येथील विद्यामंदिर हायस्कूल आणि नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालयात शिक्षण घेतल्याने तिच्या फेसबुक अकाऊंटमध्ये नमूद आहे. ती मोहम्मद शमी याच्या संपर्कात कशी आली, याबाबत कुणालाही माहिती नाही. शिवाय, तिने फेसबुकवर मोहम्मद शमीसोबतचा फोटो अपलोड केला होता. सदर प्रकरण प्रकाशात येताच तिने तो फोटो नंतर डिलिट केला. सध्या ती दहेगाव येथील तिच्या घरी नसल्याचेही आढळून आले. ती नेमकी कुठे आहे, याबाबत कुणालाही माहिती नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस २४ तासांत दहेगाव (रंगारी) येथे येणार असल्याचे खापरखेडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाबाबत पोलिसांनीही कमालीची गुप्तता पाळली आहे.

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीnagpurनागपूर