शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:07 IST

कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देविधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकास्त्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कुठेही बाजार मिळू शकतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले पीक विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला ८ टक्क्यांपर्यंत सेस द्यावा लागत होता. मात्र आता असे होणार नाही. आपले पीक कुठे व कितीमध्ये विकायचे याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतील. त्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात तत्कालीन आघाडी सरकारने २००६ मध्ये कॉन्टेक्ट फार्मिंगला परवानगी दिली होते. त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. काँग्रेसनेच खासगी कृषी बाजार समितीला परवानगी दिली होती. आज या बाजारांमध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जारी केलेल्या घोषणापत्रात काँग्रेसने कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय विक्रीला परवानगी देणे, शेतकऱ्यांना कुठेही विक्रीची परवानगी देणे यांचे आश्वसान दिले होते. संसदेत संमत झालेल्या विधेयकात याच आश्वासनांना मंजुरी देण्यात आली आहे. आता केवळ राजकीय कारणांमुळे काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष विरोध करत आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. काही लोकांचा फायद्यासाठी या विधेयकाला विरोध आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर टीका केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे झेंडे९० टक्के शेतकरी हे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप यासंदर्भात सत्य समोर आणत आहे. पंजाबमध्ये विधेयकाला विरोध होत असताना काँग्रेसचे झेंडे दिसून आले. भाजपा मतांसाठी निर्णय करत नाही. बिहारमध्ये याचा प्रभाव राहणार नाही कारण विधेयकातील तरतुदी तेथे अगोदरपासूनच लागू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीcongressकाँग्रेसMediaमाध्यमे