शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:17 IST

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अ‍ॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीएसआयआर-सीसीएमबी)सोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत मेडिकलमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी केली जाणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : मेडिकलचा हैदराबादमधील सेंटरसोबत करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अ‍ॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीएसआयआर-सीसीएमबी)सोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत मेडिकलमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी केली जाणार आहे.राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली आहे. मेडिकल व सेंटरच्या प्राधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१८ रोजी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सेंटरने मेडिकलमध्ये व्यवस्था उभी केल्यानंतर सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची अनुवांशिक तपासणी, रोग वाहक विषाणूंचा शोध, रुग्णांचे समुपदेशन, संशोधन इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. उच्च न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन यासंदर्भातील व्यवस्था तातडीने उभी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. नागपूरमध्ये सिकलसेल रुग्णांना आवश्यक उपचार मिळावे व विविध वैद्यकीय तपासणीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध व्हावीत याकरिता न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. कुलदीप महल्ले न्यायालय मित्र आहेत.कोण आहे सीएसआयआर?‘सीएसआयआर-सीसीएमबी’ ही आधुनिक जीवशास्त्र क्षेत्रातील आघाडीची संघटना आहे. उच्च दर्जाचे मूलभूत संशोधन करणे, प्रशिक्षण देणे आणि नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार करणे हे संघटनेचे उद्देश आहेत. तसेच, सामाजिक उपयोगाचे संशोधन करणे व त्या संशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहोचविणे यासाठी संघटना कटिबद्ध आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHealthआरोग्य