शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक लोकरंजनवाद लोकशाहीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 10:31 IST

लोकहिताचा विचार न करता लोकरंजनाची धोरणे राबविण्याची प्रवृत्ती जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा लोकरंजनवाद लोकशाही व संविधानिक मूल्यांसाठी धोकादायक सिद्ध होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरकर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्या. शरद बोबडे यांचे मतरशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकहिताचा विचार न करता लोकरंजनाची धोरणे राबविण्याची प्रवृत्ती जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा लोकरंजनवाद लोकशाही व संविधानिक मूल्यांसाठी धोकादायक सिद्ध होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरकर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केले.रशियातील पीटर्सबर्ग येथे नुकतीच ‘संविधानिक ओळख व वैश्विक मूल्ये’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद झाली. न्या. बोबडे त्या परिषदेत सहभागी झाले होते. ते परिषदेतील द्वितीय सत्राचे अध्यक्ष होते. ‘न्यायव्यवस्था व आधुनिक लोकरंजनवाद : आव्हाने व संभावना’ हा त्या सत्राचा विषय होता. न्या. बोबडे यांनी भारतीय व पाश्चिमात्य न्यायिक अनुभवाच्या आधारे या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करताना हे मत व्यक्त केले. रशियातील संविधानिक न्यायालयाचे अध्यक्ष व्हॅलेरी झोरकीन व सर्वोच्च न्यायालयाचे उपाध्यक्ष पीटर सेरकोव्ह व्यासपीठावर उपस्थित होते.राज्यकर्त्यांनी लोकरंजनापेक्षा लोकहिताचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु, अलीकडे लोकरंजनाला अधिक महत्त्व आले आहे. हा लोकरंजनवाद संपूर्ण जगाची समस्या झाला आहे. सर्वत्र राष्ट्रीयता, संस्कृती व परंपरेच्या नावाखाली लोकरंजनवाद राबवला जात आहे. त्याने सर्वसमावेशकता, समानता, धर्मनिरपेक्षता अशा वैश्विक संविधानिक मूल्यांना धोका निर्माण केला आहे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य व कायदेशीर अधिकारांनाही आव्हान दिले आहे. लोकरंजनवादाची चळवळ लोकशाहीची घडी विस्कळीत करीत आहे, असे न्या. बोबडे यांनी सांगितले.लोकांना खूश करून राजकीय लाभ मिळविणे हा लोकरंजनवाद होय. त्याअंतर्गत मनमानी पद्धतीने धोरणे राबविले जातात. त्याकरिता लोकशाहीचा गळा दाबणे, न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करणे अशा नाना पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे न्यायव्यवस्थेने आवश्यक तेव्हा आपल्या अधिकारांचा वापर करून लोकरंजनवादावर नियंत्रण ठेवण्याचे जोरकस प्रयत्न केले पाहिजे. जगाच्या कल्याणाकरिता संविधानिक मूल्ये टिकायला हवीत, असेही न्या. बोबडे यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित केले.

टॅग्स :Socialसामाजिक