शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाची हजेरी

By निशांत वानखेडे | Updated: September 24, 2024 18:55 IST

वेधशाळेचा अंदाज खरा ठरला : बहुतेक जिल्ह्यात सरी, तापमान घसरले

नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाला पहिल्या दिवशी हुलकावणी देणारा पाऊस दुसऱ्या दिवशी मात्र बरसला. साेमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम हाेता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान पावसामुळे माेठ्या फरकाने खाली घसरले व उकाड्यापासून दिलासा मिळाला.

हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जाेरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व इतर वातावरणीय परिस्थितीमुळे मध्य भारतासह इतरही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अंदाज असतानाही २३ सप्टेंबरराेजी दिवसभर पावसाचा थेंबही बरसला नाही. उलट वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मध्यरात्री मात्र वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. २४ सप्टेंबरच्या सकाळी आकाश काळ्याभाेर ढगांनी वेढले हाेते. पावसाचा जाेर दुपारी ३ पर्यंत कायम हाेता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पावसाचा जाेर अधिक हाेता.

नागपुरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत २४ तासात २३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. भंडाऱ्यात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला सकाळपर्यंत बरसलेला पाऊस नंतर शांत हाेता. इतरही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली.

२५ ला अलर्ट

२४ ते २६ सप्टेंबर या काळात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्यम २५ सप्टेंबर राेजी अतिजाेरदार पावसाची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे.

हा परतीचा पाऊस नाहीदरम्यान २३ सप्टेंबरपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून २४ सप्टेंबर राेजी राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणाच्या काही भागातून काढता पाय घेतला. मान्सून परतीची लाईन फिराेजपूर, सिरसा, माउंट अबू, चुरू, अजमेर, दीसा, सुरेंद्रनगर, जुनागड या भागातून गेली व ती हळूहळू पुढे सरकत आहे. विदर्भ व मध्य भारतात सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातून ५ ते १० सप्टेंबरदरम्यान मान्सून निघण्याची व या काळात मध्यम पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. १५ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून देशातून निघून जाईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर