शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मोखाबर्डीची पाईपलाईन मातीत

By admin | Updated: June 28, 2017 02:53 IST

विदर्भातील माती भुसभुशीत असल्याने जमिनीला लवकरच भेगा पडतात. स्वाभाविकच मोखाबर्डी प्रकल्पाचाही ‘स्पॉट’ तंतोतंत तसाच आहे.

अधिकारी, कंत्राटदार मालामाल : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे हालअभय लांजेवार / शरद मिरे । लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : विदर्भातील माती भुसभुशीत असल्याने जमिनीला लवकरच भेगा पडतात. स्वाभाविकच मोखाबर्डी प्रकल्पाचाही ‘स्पॉट’ तंतोतंत तसाच आहे. याचाच आधार घेत तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मोखाबर्डी योजनेची रचना आखल्या गेली. कंत्राट देताना करारनाम्यात अनेक बाबी नमूदही करण्यात आल्या. परंतु या बाबींना बगल देत कंत्राटदाराने रेतीवर टाकावयाची पाईपलाईन चक्क मातीत टाकून, दाबून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या माती प्रकरणाची पोलखोल करून लाखो रुपयांची ‘मलाई’ कुणाच्या घशात गेली याचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्र व राज्य शासन या योजनेला ‘आदर्श’ प्रकल्प करण्याच्या तयारीत आहे. असे असताना या योजनेला ‘माती’चे गालबोट लागावे ही बाब गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत;. सोबतच ‘रेती दाखवा अन् बक्षीस मिळवा’ अशी उपहासात्मक चर्चा केली जात आहे. या प्रकल्पाचे काम १५०० एचपी क्षमता असलेल्या १५ पंपांच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. पंपहाऊसपासून साडेचार किमीच्या अंतरावर तीन रांगेत सुमारे १,८०० पाईप जोडले जातील. तीनपैकी दोन रांगांचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे.तिसऱ्या रांगेच्या खोदकामात खडक लागल्याने डिलिव्हरी चेंबरलगतच्या कामाची गतीही मंदावली आहे. पाईपलाईनचे काम करताना पाईपच्या आत पाईप टाकण्याचे काम केले जात आहे. सदर पाईप जोडले जात असताना प्रत्येक पाईपखाली ३० एमएम रेतीचा थर टाकणे गरजेचे आहे. जमिनीला हादरविणाऱ्या आणि पाईपमधून धो धो वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह भुसभुशीत जमिनीला भेगा पाडत असतो. या भेगा पाईपसाठी धोकादायक ठरतात. अशातच जमिनीला भेगा पडल्यास या भेगांमध्ये पाईपखाली टाकण्यात आलेली रेती समाविष्ट होते. यामुळे वितरण प्रणालीला कोणताही धोका होत नाही. ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आणि तेवढीच गंभीर होत असताना कंत्राटदाराने या कामात हयगय केल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी पाईपलाईन नजरेस पडते अशा ठिकाणी थोडी फार रेती टाकून उर्वरित पाईपलाईनखाली माती टाकून हे काम करण्यात आले आहे.अधिकाऱ्याची बोलती बंदआंभोरा उपसा सिंचन विभाग भिवापूरचे कार्यकारी अभियंता डॉ. हितेंद्र चांदेवार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. १५ जुलैपर्यंत सदर योजना उभी होईल. योजना कार्यान्वित व्हायला १५ दिवस अथवा तीन महिनेही लागू शकतात, असे उत्तर दिले. रेतीऐवजी माती टाकल्याचा प्रताप कंत्राटदाराने केल्याची बाब कानावर टाकताच ते काही मिनिटे काहीच बोलले नाही. पाईपला पडल्या भेगापाईपलाईनच्या सभोवताल सिमेंटचे आवरण केल्या जाते. सिमेंटचे केलेले आवरण बघताच त्याचा दर्जा लक्षात येतो. सद्यस्थितीत पाईपलाईनच्या सभोवताल करण्यात आलेल्या या आवरणाला आतापासूनच भेगा पडल्याचे दिसून येते. त्यावरून हे काम कोणत्या दर्जाचे आहे, हे विचारायला नको.