शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईल सांगेल जवळच्या टॉयलेटचे 'लोकेशन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 15:32 IST

बाहेर असताना लघुशंका आली व वेळेवर टॉयलेट न मिळाल्यास ते खरच त्रासदायक ठरते. यावर नागपूरकर टीमने एक उपाय शोधला आहे. टॉयलेटचा पत्ता सांगणारा 'क्विक पी' हा मोबाईल अॅप त्यांनी तयार केला आहे, जो तुम्हाला खरच मदतीचा ठरू शकतो.

ठळक मुद्देचिमुकलीच्या कल्पनेतून तयार झाले ॲप देशातील ३५ शहरांचा डेटा उपलब्ध

निशांत वानखेडे

नागपूर : कोणत्याही शहरात फिरताना अचानक आलेली लघुशंका वेळेवर टॉयलेट न मिळाल्याने सर्वात त्रासदायक ठरते. हा अनुभव बहुतेकांना आला आहे. महिलांची होणारी कुचंबणा विचार न केलेली बरी.

अशा परिस्थितीत जवळच टॉयलेट सापडले तर श्वास मोकळा झाल्यासारखा वाटतो. जीव गुदमरायला लावणाऱ्या अशा परिस्थितीत जवळच्या टॉयलेटचा पत्ता सांगणारा तुमच्या मोबाइलचा अॅप दिलासा देऊ शकतो. 'क्विक पी' असे या अॅपचे नाव असून नागपूरकर टीमने तो तयार केला आहे. हा अॅप गुगल प्ले स्टोअरवर निशु:ल्क उपलब्ध आहे. 

हे अॅप तयार करणाऱ्या कंपनीचे संचालक अभियंता अजित धार्मिक यांनी यामागची मजेशीर पार्श्वभूमी सांगितली. एका चिमुकलीला झालेला त्रास व त्यातून तिला सुचलेल्या कल्पनेतून अॅप तयार करण्यात आले आहे. धार्मिक यांचा मित्र एकदा कुटुंबाला घेऊन सीताबर्डी परिसरात खरेदीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला लघुशंका आली होती. यावेळी बऱ्याच वेळा फिरुनही  स्वच्छतागृह न सापडल्याने त्यांना परत घरी यावे लागले.

घरी टॉयलेटमधून बाहेर निघाल्यावर चिमुकलीने त्या मोबाइलद्वारे या समस्येवर काही उपाय करता येणार नाही का, असा प्रश्न विचारला. त्या मित्राने मुलीची ही कल्पना धार्मिक यांना सांगितली व या 'क्विक.पी' अॅपच्या निर्मितीला सुरुवात झाली. या अॅपमुळे अनेकांना मदत मिळणार हे नक्की.

 कुठेही गेलात तरी अॅपचा वापर करा

या अॅपमध्ये नागपूरसह देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, पुणे, जयपूर आणि ३५ प्रमुख शहरांमधील शौचालये, स्वच्छतागृहांची माहिती स्टोअर केली आहे. त्या शहरात गेल्यानंतर मोबाइल अॅपवर शोध घेतल्यास तुमच्या लोकेशनच्या एक ते पाच किलोमीटरच्या परिघात जवळ असलेल्या टॉयलेट व स्वच्छतागृहाची माहिती तुम्हाला दिशानिर्देशासह मिळेल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञानJara hatkeजरा हटके