शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शाळेवर उभारले मोबाईल टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:43 IST

शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारून शाळेचे संचालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. टॉवरचे दुष्यपरिणाम सर्वश्रुत असतानाही, शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ : शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारून शाळेचे संचालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. टॉवरचे दुष्यपरिणाम सर्वश्रुत असतानाही, शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे.हुडकेश्वर रोडवर साकेत कॉन्व्हेंट स्कूलच्या इमारतीवर एक भलेमोठे मोबाईल टॉवर लावण्यात आले आहे. या माध्यमातून शाळेचे संचालक उत्पन्न मिळवित आहे. मात्र या टॉवरचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर काय होऊ शकतात, याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे शिक्षण हक्क कायदे २००९ च्या कलम ९ मध्ये शालेय इमारतीची देखभाल करणे व शालेय इमारतीचा परिसर फक्त शाळेसाठी वापरला जातो की नाही याचे परीक्षण करणे, असा स्पष्ट उल्लेख आहे. पण साकेत कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शाळेच्या इमारतीचा वापर उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक ठरेल, अशी यंत्रणा शाळेच्या इमारतीवर उभी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. पण या अधिकाऱ्यांनाही कधी टॉवरच्या बाबतीत गांभीर्य लक्षात आले नाही. टॉवरच्या परिणामाबद्दल कुणालाच जनजागृती नसल्याने संचालकांची मनमानी सुरू आहे. मोबाईल टॉवर स्लो पॉयझनमोबाईलचे टॉवर ज्या ठिकाणी उभे राहते त्याच्या ३०० ते ४०० मीटर अंतरावर ७ ते ८ हजार मायक्रोव्हॅटचे रेडिएशन पसरते. त्याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतात. गर्भवती महिलांवर त्याचा परिणाम होतो. डोके दुखणे, अशक्तपणा, चिडचिड या समस्या संशोधनातून अनुभवायला आल्या आहेत. मोबाईल टॉवर हे स्लो पॉयझन आहे. ४ ते ५ वर्ष सातत्याने टॉवरच्या संपर्कात राहिल्यास ब्रेनट्युमर, ब्रेनकॅन्सर सारखे दुर्धर आजार होऊ शकतात.गौरव सव्वालाखे, रेडिएशन एक्स्पर्ट

टॅग्स :SchoolशाळाMobileमोबाइल