शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल टाॅवर रेडिएशनमुळे चिऊताई संकटात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग (वेव्हज) हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, ...

निशांत वानखेडे

नागपूर : माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग (वेव्हज) हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, हे आता प्रयाेगानिशी सिद्ध झाले आहे. मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे. जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार २००० ते २०२० पर्यंत २० वर्षांत चिमणीच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट झाली आहे व यासाठी रेडिएशन हेही एक माेठे कारण आहे. उल्लेखनीय म्हणजे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासात ही गाेष्ट स्पष्टपणे जाणवली हाेती.

सध्या अमरावती विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. के. जी. पाटील आणि इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स, नागपूरचे प्राध्यापक डाॅ. वीरेंद्र शेंडे यांनी जुलै २०११ ते जून २०१२ या वर्षभराच्या काळात कळमेश्वर परिसरात काही गावात हा अभ्यास केला आहे. त्या काळात कळमेश्वरमध्ये ६ टाॅवर तर सावंगी, सेलू, उबली येथे दाेन आणि इतर गावात एक-एक टाॅवर हाेते. डाॅ. पाटील व डाॅ. शेंडे यांच्या टीमने प्रत्येक टाॅवरपासून ३०० मीटरच्या अंतरावरून चिमण्या तसेच इतर पक्ष्यांचे सर्वेक्षण केले. महिन्यातून शनिवार व रविवार दाेनदा वर्दळ कमी असताना पहाटे ५.१५ ते ११.१५ व दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ या काळात टाॅवरजवळील रस्ते, पांदण, शेत, पाणवठे, चाैक, पार्क, झाडे आदी ठिकाणी लाईन ट्रान्झिट पद्धतीने हे सर्वेक्षण झाले. त्यांच्या अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी डाॅ. शेंडे यांनी लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केल्या.

अभ्यासातील महत्त्वाचे बिंदू

- सर्वाधिक टाॅवर असलेल्या कळमेश्वर शहराजवळ चिमण्यांच्या संख्येत सातत्याने घट झाली.

- एक टाॅवर असलेल्या दहेगाव, डाेर्ली, परसाेडी, ब्राह्मणी, वडाेदा, उबली आदी गावांमध्ये चिमण्यांची संख्या वाढली.

- दाेन टाॅवर असलेल्या सावंगी, सेलू भागात चिमण्यांमध्ये घट. जवळ एमआयडीसी असल्याने घट झाल्याचे कारण.

- जुलै ते फेब्रुवारी दरम्यान वाढ. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रजननाचा काळ असल्याने वाढ असल्याचे दिसते.

- मात्र मार्चनंतर रेडिएशनमुळे नवजातांचा मृत्यू अधिक असल्याने घटली संख्या.

रेडिएशनचे परिणाम

- टाॅवरच्या १ मीटरवर ७९,६००,००० मेगाहर्टझ फ्रिक्वेन्सी. १०० मीटरवर ७९६० तर ५०० मीटरवर ३१८ मे.ह.

- १ ते १० मीटरवर चिमण्यांचे प्रमाण केवळ १ टक्के. ११ ते १०० मीटरवर २० टक्के, १०१ ते २०० मीटरवर ३५ टक्के आणि २०१ ते ३०० मीटरवर ४४ टक्के संख्या दिसून आले.

- रेडिएशनमुळे चिमण्यांच्या घरटे बनविणे, प्रजनन आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

जगभरातील अभ्यासाचे सत्य

- नेदरलॅंडमध्ये २५ वर्षात ५० टक्के हाऊस स्पॅराे घटल्या. त्यामुळे रेड लिस्टमध्ये टाकले.

- यूकेच्या लंडनमध्ये ७१ टक्के घट. ग्लासगाे, हंबर्ग, एडिनबर्ग आदी शहरातही धाेकादायक स्थिती.

- बर्लिन, ब्रुसेल्स, डबलिन, स्पेन, डच अर्बन तसेच पश्चिम युराेपमध्ये चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट.

दहा वर्षापूर्वी केलेला हा अभ्यास बँकाॅकमधील परिषदेत सादर केला हाेता. त्यावेळी टाॅवरची संख्या अतिशय कमी हाेती. आज ती कितीतरी पटींनी वाढली आहे. त्यामुळे शहरी भागातून चिमण्या जवळजवळ दिसेनाशा झाल्या आहेत. संख्या कमी हाेण्यासाठी मानवनिर्मित इतरही कारणे आहेत पण रेडिएशन हे न समजणारे सर्वात माेठे कारण आहे आणि भविष्यात त्याचे भीषण परिणाम दिसतील.

- डाॅ. वीरेंद्र शेंडे, इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स.