शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

मोबाईल विक्रेते ‘हँग’

By admin | Updated: June 5, 2016 02:38 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी एकाच वेळी ठिकठिकाणच्या अनेक मोबाईल शोरूमवर धाडी घालून आठ ते दहा मोबाईल विक्रेत्यांवर कारवाई केली.

नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी एकाच वेळी ठिकठिकाणच्या अनेक मोबाईल शोरूमवर धाडी घालून आठ ते दहा मोबाईल विक्रेत्यांवर कारवाई केली. आॅनलाईन मोबाईल बोलवून ग्राहकांना त्याची जास्त दरात विक्री करणे, रजिस्टर्ड लोगो (ट्रेडमार्क) चा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणे, आदी आरोप या मोबाईल विक्रेत्यांवर लावण्यात आले आहेत. उपराजधानीत गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईलची बनावट अ‍ॅसेसरीज (बॅटरी, चार्जर, कव्हर, इयरफोन) विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कंपनीचा लोगो वापरून ओरिजनलच्या नावाखाली ग्राहकांना हा बनावट माल विकला जातो. त्याची पावतीही बनावट असते. अलीकडे आॅनलाईन मोबाईल बोलवून ग्राहकांना हा जास्त दरात विकण्याचा सपाटा काही मोबाईल विक्रेत्यांनी लावला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी करूनही संगनमत असल्याने पोलीस कारवाई करीत नाही. विशेष म्हणजे, महाजन मार्केटमध्ये मोहम्मद जावेद शरीफ यांच्या मालकीचे सिटी कलेक्शन नामक मोबाईल शोरूम आहे. त्यांनी प्रशासनाकडे दुकानाचा लोगो (ट्रेडमार्क) रजिस्टर्ड केला आहे. त्यांच्या दुकानात होणारी गर्दी लक्षात घेता सीताबर्डी, धंतोलीतील अनेक दुकानदारांनी आपल्याही दुकानावर सिटी कलेक्शनचा (मागे-पुढे दुसरे नाव लावून) बोर्ड लावला. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर जावेद शरीफ यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दिली. कारवाईसाठी भक्कम पुरावेसुद्धा दिले. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर कारवाई थंडबस्त्यात टाकली. त्यामुळे जावेद शरीफ यांनी सहआयुक्त राजवर्धन सिन्हा आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडी घातल्या. (प्रतिनिधी)दडपण आणण्याचा प्रयत्न या कारवाईमुळे मोबाईल विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. काहींनी पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी त्यांना कायद्याची भाषा ऐकवताच दडपण आणू पाहणारे गप्प बसले. अनेकांनी आपल्या शोरूमवरच्या फलकावरून तातडीने ‘सिटी‘ नावाची (ट्रेडमार्क) अक्षरे काढून टाकली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण कुकरेजा, अजय बजाज (स्मार्ट सिटी कलेक्शन) जितेंद्र खुबनानी (सिटी मोबाईल मेंशन), संजय कुकरेजा, लक्ष्मण कुकरेजा,सुरेंद्र ढिल्लो (न्यू मॅजिक सिटी मोबाईल), मानव परमानी (सिटी मोबाईल), लक्ष्मण मोटूमल कुकरेजा, प्रकाश धर्मानी (सिटी मोबाईल कलेक्शन), सन्नी शोभराज खुबनानी (सिटी सेंटर मोबाईल मॉल), मुकेश खुबनानी (सिटी मोबाईल मार्केट), प्रल्हाद नामुमल सेतिया, राहुल जयकुमार अडवानी (मॅजिक मोबाईल अ‍ॅन्ड सिटी कलेक्शन), विक्रम मोहनलाल चूग (आॅरेंज सिटी मोबाईल) या नऊ मोबाईल विक्रेत्यावर विविध कलमानुसार कारवाई केली. उपरोक्त आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली तर, चार जण फरार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांची जमवाजमवसहआयुक्त राजवर्धन सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सीबीआय स्टाईल एकाच वेळी अनेक शोरूममध्ये कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे एसीपी नीलेश राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी विविध पथकातील पोलीस अधिकारी तसेच वेगवेगळ्या ठाण्यातील कर्मचारी एकत्र केले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, दीपक खोब्रागडे, पंडितराव सोनवणे, श्री खटके, एपीआय गोकुळ सूर्यवंशी, प्रमोद सानप, उपनिरीक्षक हिरुडकर, राजपूत, त्रिपाठी आणि सचिन लुले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त ठिकाणी धाडी टाकून मोबाईल विक्रेत्यांवर कारवाई केली.