शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

ओला, उबरच्या विंड स्क्रीनवर मोबाईल : गूगल मॅप पाहून चालवितात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:31 PM

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वायरलेस मोबाईलचा वापर करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावर थांबून मोबाईल हाताळणे हे बेकायदेशीर ठरत असताना उपराजधानीत मात्र ओला, उबर चालक विंड स्क्रीनवर मोबाईल लावून ‘गूगल मॅप’ पाहत सर्रास धावतात, हा गुन्हा नाही का? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देमोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वायरलेस मोबाईलचा वापर करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावर थांबून मोबाईल हाताळणे हे बेकायदेशीर ठरत असताना उपराजधानीत मात्र ओला, उबर चालक विंड स्क्रीनवर मोबाईल लावून ‘गूगल मॅप’ पाहत सर्रास धावतात, हा गुन्हा नाही का? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मेट्रो सिटी म्हणून होऊ घातलेल्या नागपुरात खासगी कंपन्यांचे म्हणजे ओला, उबर या ‘वेब बेस्ड टॅक्सी’ सेवेचे महत्त्व वाढले आहे. घरपोच व आरामदायी सेवा असल्याने या कॅबला अधिक पसंती दिली जात आहे. गरजेनुसार वेळेत कॅब उपलब्ध होत असल्याने अनेकांचा प्रवास सुकर झाला आहे. कॅबचे आॅनलाईन बुकिंग केल्यानंतर वाहनाचा नंबर, प्रकार, चालकाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर याचा मॅसेज येत असल्याने प्रवाशांच्या सोयीचे झाले आहे. कॅब चालकाकडे जीपीएस किंवा जीपीआरएस यंत्रणेसह वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग व भाडे दर्शवणारा निदर्शक असणे बंधनकारक केल्याने याचा फायदाही प्रवाशांना होत आहे. परिवहन विभागानेही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅपआधारित या टॅक्सी सर्व्हिसेसना नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ओला, उबर टॅक्सींना ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक केली आहे. अ‍ॅपवर आधारित असा स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक केले आहे. उपराजधानीत रोजगार वाढला हेही तेवढेच खरे असताना, मात्र या कॅबच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.काय म्हणतो मोटार कायदावाहन चालविताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मोबाईलच नव्हे तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करणे, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईल हाताळणे हा महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार गुन्हा ठरतो. मात्र बहुसंख्य कॅब चालक वाहनाच्या विंड स्क्रीनजवळ मोबाईल अडकवून ‘गूगल मॅप’ पाहत रहदारी करताना दिसतात, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.‘गुगल मॅप’ पाहत वाहन चालविणे गुन्हाच विंड स्क्रिनवर मोबाईल अडकवून ‘गुगल मॅप’ पाहत चालक जर वाहन चालवित असेल तर तो गुन्हा ठरतो. परंतु चालकाने रस्त्याच्याकडेला गाडी थांबवून त्याचा वापर केल्यास तो गुन्हा ठरत नाही.-शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहरवैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावाहन चालविताना एक सेंकद जरी लक्ष विचलित झाले तर अपघात होतो. यामुळे मोबाईल पाहून वाहन चालविणे हा गुन्हाच आहे. प्रत्येक वाहन चालकाने वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.रवींद्र कासखेडीकरसचिव, जनआक्रोश

टॅग्स :OlaओलाMobileमोबाइल