शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागातील फिरते आरोग्य पथक अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:50 IST

शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.

ठळक मुद्देगरोदर माता, बालकांच्या तपासणीवर परिणाम: अधिकृत पत्र न देताच डॉक्टरांना केले कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.औद्योगिक क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांना व मजुरांच्या कुटुंबीयांना ‘आरसीएच’ सेवा व लसीकरण सेवा पुरविण्यासाठी एकात्मिक जिल्हा आरोग्य सोसायटी नागपूरकडून मोबाईल मेडिकल युनिट २०१२ रोजी स्थापन करण्यात आले. एका आरोग्य पथकात एक महिला वैद्यकीय अधिकारी व एक आरोग्यसेविका असते. हे पथक गावोगावी भेट देण्यासह गरोदर माता, बालकांच्या आरोग्याची तपासणी करते. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून एक वाहन, औषधीसाठा व इतर साहित्य मिळते. २०१२ पासून ही आरोग्यसेवा निरंतर सुरू होती. पथकातील डॉक्टर मानधन तत्त्वावर कार्यरत असून, त्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार करावा लागतो. मिहान, वाडी व नरसाळा हे मोठे क्षेत्र आहे. येथील अंगणवाड्यांंना फिरते पथक भेट देऊन त्या त्या गावातील गरोदर माता व बालकांची तपासणी करते. मात्र, २०१९-२० च्या कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ही योजना प्रस्तावित करण्यात येणार नसल्याने शासनाने ही योजना बंद करण्यात यावी, असे पत्र १९ जानेवारी २०१९ रोजी काढले. मार्च २०१९ मध्ये जि.प.च्या आरोग्य विभागाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर संबंधितांना पत्र पाठविले. परंतु, अधिकृत पत्र वा कोणतीही सूचना न देता आरोग्य पथक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे समायोजन करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्तांना २७ मार्च २०१९ रोजी पत्र लिहिले; मात्र अद्यापही डॉक्टर व परिचारिकांचे समायोजन झाले नाही.वरिष्ठांच्या चुकीचा पथकातील डॉक्टरांना फटकाफिरते पथक सुरू झाले तेव्हापासून डॉक्टर व आरोग्यसेविका दर महिन्याला संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना कार्याचा अहवाल सादर करतात. हा अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना शासनाकडे पाठवावा लागतो. मात्र, आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी ‘डीएचओं’ना पत्र पाठवून योजनेचा भौतिक व आर्थिक अहवाल वारंवार सूचित करूनही आपल्या कार्यालयाकडून पाठविण्यात येत नसल्याचा ठपका ठेवून योजना बंद करावी, असे निर्देश दिले आहे. यावरून चूक वरिष्ठांची फटका मात्र पथकातील डॉक्टरांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले.शासनस्तरावर पथक बंद केलेपथक सुरू ठेवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र शासनस्तरावरूनच पथक बंद करण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे आठवडाभरात समायोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर