शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:57 IST

सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला.

ठळक मुद्देबंद घरी लोकांचा दिवसपुरुष मंडळींचा भाजी, किराणा आणण्यात होतो फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा काळ. सगळंच बदललंय. सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला. यात मोबाईल हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. याशिवाय कुणी कुटुंबासोबत लुडो, सापशिडीचा खेळ, अष्टाचौवा अशा खेळात रमले आहेत तर कुणी गाण्यांच्या भेंड्या खेळत आहेत. अनेकांना या दिवसात पुस्तकांची गोडी लागली आहे तर अनेकांसाठी टीव्ही जवळचा झाला आहे. अनेकांच्या कुटुंबात जुन्या आठवणींतून चर्चांना रंग चढत आहे. काहीजण इंटरनेटवरून खाद्यपदार्थांची रेसिपी बघून तो पदार्थ तयार करीत सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. या काळात किराणा, भाजी आणायची मुभा असल्याने तेवढीच एक फेरफटका मारण्याची संधी लोकांना मिळते आहे. बंदिस्त घरात राहण्याची वेळ आली असली तरी ही सर्व परिस्थिती सर्वांना आयुष्यभर लक्षात राहणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत लोकांशी संपर्क करून दिनचर्या विचारली असता प्रत्येक कुटुंबाच्या अनेक किस्से, कहाण्या समोर येत आहेत.पुस्तक, मोबाईल आणि झोपगांधीबाग निवासी मोनाली भोईटे यांनी लॉकडाऊनमध्ये चाललेल्या दिनचर्येविषयी सांगितले. आधी सकाळपासून आॅफिसला जायची घाई असायची. आता सर्वच थांबल्यासारख वाटते. वेळ असल्याने आईच्या कामात मदत करते. जेवणानंतर दुपारी थोडीशी झोप तर होतेच. यापूर्वी कधी अशी निवांत झोप मिळाली नव्हती. लॉकडाऊन लागणार याचा अंदाज आला होता त्यामुळे अनेक पुस्तकांची जुळवाजुळव केली होती. अनेक वर्षापासून पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नव्हती. आता पुस्तके वाचण्यात वेळ जात आहे. शिवाय आईबाबांशी गप्पाही होत आहेत. सायंकाळी मोबाईलवर मित्रांशी गप्पा होतात. घरच्या फुलझाडांना पाणी देण्याचे काम होते. त्यानंतर पुन्हा घरची स्वयंपाकाची कामे आणि जेवणानंतर थोडा मोबाईलवर वेळ घालविला की झोप जवळ येते.दिवसभर खेळ अन् बाबांचे नाटकांचे किस्सेश्रीकृष्णनगर येथील रागिणी वेणी म्हणाल्या, यापूर्वी इतका निवांत वेळ कधी मिळाला नव्हता. ना मुलांना आणि आम्हालाही नाही. सध्यातरी आॅफिसचे टेन्शन नाही. माझा मुलगा आणि आसपासच्या मुलांसोबत लुडो, सापसिडी तर कधी कॅरमचा खेळ चालतो. कधी तर गाण्याच्या भेंड्या रंगात येतात आणि आम्हीही त्यांच्यात सामील होतो. बाबा नाट्य कलावंत होते. त्यामुळे त्यांच्याकडे विविध नाटकांतले खूप सारे किस्से आहेत. त्यांचे किस्से ऐकण्यात बराच वेळ निघून जातो. मुलांचा चिवचिवाट चाललेला असतो. थोडे कंटाळवाणे वाटते पण हे दिवस निघून जातील. पुन्हा असा वेळ कधी मिळणार नाही. मात्र हा काळ खरोखरच आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस