शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा

By admin | Updated: May 4, 2016 04:00 IST

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी

नागपूर : महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. विदर्भवाद्यांनी अखंड महाराष्ट्राचा झेंडा जाळून राज्याच्या अस्मितेचा अपमान केला, त्यामुळे हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. १ मे रोजी राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला होता, हे विशेष.नागपुरातील धरपमेठ परिसरात सायंकाळी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपप्रमुख प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. विदर्भवाद्यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही व त्याचे तुकडेदेखील होऊ देणार नाही, या आशयाची निदर्शने केली. आंदोलन आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कुठलीही अनुचित घटना न करता मनसे नागपूरतर्फे महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. पण विदर्भवाद्यांनी अखंड महाराष्ट्राचा संदेश लिहिलेला मनसेचा झेंडा जाळल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष अजय ढोके, महेश जोशी, प्रशांत निकम, उमेश बोरकर, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, मनीषा पापडकर, सुश्रुत खेर, मंगेश डुके, आशिष वार्डेकर, हर्षद दसरे, ऋषिकेश जाधव, मिलिंद माने, युवराज नागपुरे, शशांक गिरडे, समीर अरबट यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)