शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

Nitin Gadkari, Raj Thackeray in Nagpur: एकदा शो पाहिलेल्यांनी पुन्हा येऊ नये; राज ठाकरेंच्या उपस्थितीत नितीन गडकरींकडून फाऊंटन शोचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 22:49 IST

Nitin Gadkari, Raj Thackeray in Nagpur: नागपुरातील फुटाळा तलावावर हा शो उभारण्यात आला आहे. शो बंद करावा लागेल. सहकार्य करावे. थंडी पडायला सुरुवात होईल यामुळे सात ऐवजी साडे सहाला शो ठेवावा. तीन शो ठेवावेत, अशी विनंती नितीन गडकरी यांनी केली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरातील जागतिक पातळीवरील फाऊंटन वॉटर शोचे उद्घाटन करण्यात आले. या शोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी गडकरींनी ज्या लोकांनी आज शो पाहिला आहे, त्यांनी पुन्हा येऊ नये असे आवाहन केले आहे. 

नागपुरातील फुटाळा तलावावर हा शो उभारण्यात आला आहे. येथे मोठे रेस्टॉरंट होणार आहे. फुडमॉल होणार आहे. लोकांना कमी किंमतीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच या ठिकाणी दहाव्या मजल्यावर चार मल्टीप्लेक्स देखील होणार आहेत. मागच्या बाजुला ७०० गाड्यांचे पार्किंग थेट पर्यटक शो पहायला येतील. स्वर्गिय लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार आहे, असे गडकरी म्हणाले. 

फाऊंटनच्या बाजुला १०००० स्क्वे. फुचाचा प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. साधारण ३००० लोक वरती आणि २००० लोक खाली खुर्च्यांवर बसू शकतील असे असेल. मागची इमारत ११ मजल्यांची असेल. त्यात ११०० गाड्यांचे पार्किंग होईल. सोलार रुफटॉप रेस्टॉरंट उभारले जाणार आहे. 

जागतीक दर्जाचे फ्ल़ॉवर गार्डन देखील होणार आहे. बॉटनिकल गार्डनही होणार आहे. लोटस गार्डन बनविणार आहे. सुमारे ९५० प्रजाती असणार. फाऊंटनचे आर्किटेक्ट फ्रान्सचे आहेत. पंप तुर्कीचे आहेत. ए आर रेहमान यांचे संगीत आहे. बच्चन यांचा आवाज आणि मराठीत नाना पाटेकरांचा आवाज असणार आहे. फाऊंटनचे काम नागपूरच्य़ाच कंत्राटदाराने केले आहे, असे गडकरी म्हणाले. 

 

एकदा शो पाहिला त्यांनी पुन्हा येऊ नये. गर्दी एवढी झालेली की कंट्रोल होणार नाही. शो बंद करावा लागेल. सहकार्य करावे. थंडी पडायला सुरुवात होईल यामुळे सात ऐवजी साडे सहाला शो ठेवावा. तीन शो ठेवावेत, अशी विनंती गडकरी यांनी केली. 

भारतात पाहिला नाही असा शो...मी असा शो आजपर्यंत कधी भारतात पाहिलेला नाही, भारता बाहेरच पाहिला आहे. गडकरी सारे वरूनच करतात. कारंजा वर जातो, फ्लायओव्हर वर जातो. दोघांचेही मन जुळण्याचे कारण म्हणजे भव्यदिव्य, आमचे विचार भव्य. मी नागपूरला का यावे, आणखी एक कारण मिळाले. संत्रा नगरी आणि आता कारंजा नगरी. जे पाहिले ते बाथरुममध्येच कारंजे पाहिलेत. देशातील लोक हा शो पाहण्यासाठी येतील. त्याच्यासाठीची बांधणी होणे गरजेचे, असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेnagpurनागपूर