ऑनलाइन लोकमत
नाागपूर,दि.17 - महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी यावेळी मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कुठलिही परीक्षा द्यावी लागणार नाही. पक्षाकडूनच परीक्षेचा फार्म्युला मागे घेण्यात आला आहे. इच्छुकांना थेट उमेदवारी अर्ज दिले जात असून 25 जानेवारीपासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मनसेचे प्रवीण सांदेकर व श्रावण खापेकर हे दोन नगरसेवक होते. त्यापैकी खापेकर हे काँग्रेसवासी झाले आहेत.